दिनांक 3 जानेवारी 2024 वार बुधवार रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कॉन्व्हेन्ट, सेठ तुळशिरामजी ढोकणे इंग्रजी प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय तथा कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव, ता. जळगांव जामोद येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. सौ. ज्योतीताई अशोकराव ढोकणे, महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योती वानेरे, प्राध्यापिका विद्या काटले यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. विद्यार्थांच्या भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, घेण्यात आल्या. क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे सर्वांनी कौतुक केले. यावेळी माध्यमिक मुख्याध्यापिका प्रभा वावगे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रवीण दाते, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अतुल उमाळे, विजय बोंबटकार, विठ्ठल भारसाकळे, योगेश गोडाळे, रवी सातव, प्रवीण रंदळे, वैशाली गोतमारे, पुनम करांगळे, रेणुका भोंगे, हर्षदा उमाळे, भारती सातव, मोनिका ढगे, मंदा ढोकणे, सानिका जाधव, स्वाती भुसारी, किसन तायडे, विनोद उंबरकार सर्व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन राष्ट्रीय सेवा योजना युनिट च्या विद्यार्थ्यांनी केले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Savitri Mata Phule