लिंब, दि. १४ जानेवारी : महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती पाहून महाराष्ट्रातील बहुजन समाज धास्तावलेला आहे. या सामाजिक परिस्थितीत सुधारणा व्हावी असे वाटत असेल तर दलित ओबीसीनी एकत्र येऊन सत्ता काबीज करावी. यासाठी दलितांचे नेते अड. प्रकाश आंबेडकर आणि ओबीसींचे नेते ना. छगनराव भुजबळ यांनी एकत्र येऊन विचार करावा असे मत सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरातील भाषणात सुरेश कोरडे यांनी व्यक्त केले.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे होते. सौभाग्य मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातून समन्वयक उपस्थित होते. प्रशिक्षण शिबीरात प्रकाश कांबळे काशीळकर, जायभाय सर सातारा यांनी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात जिल्ह्यातील ओबीसी समाज दडपणाखाली असून तो आपले मत उघडपणे व्यक्त करू शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगून मुख्यमंत्री ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. असे म्हणत आहेत परंतु मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचे काम चालूच मराठा समाजासाठी आहे. समित्या नेमल्या जात आहेत. त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाल्यास प्रस्थापितांना सत्तेवरून खाली खेचावे लागेल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र बनवणे, भानुदास वास्के, जयसिंग कुंभार, शिरीष जंगम, सुनीताताई लोहार, अनिल लोहार, महाबळेश्वर, अनिल सुतार पाटण, प्रमोद शिरसागर, उद्धव करणे, प्रमोद बोराटे, वैभव गवळी यांनी परिश्रम घेतले महासचिव प्रमोद क्षीरसागर यांनी उपस्थितांचे
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan