जत दि.८ जानेवारी २०२४ - लोणारी समाजाचे नेते स्व. विष्णुपंत दादरे साहेब यांची जयंती जत येथे साजरी करण्यात आली.. यावेळी लोणारी,ओबीसी, बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओबीसी नेते तुकाराम माळी यांनी विष्णुपंत दादरे साहेब यांच्या कार्याची माहिती सांगताना म्हणाले की
विष्णूपंत दादरे(दादा) यांचा जन्म शिरपूर जि.धुळे येथे अत्यंत गरीब कष्टकरी परंतू उमद्या विचारांच्या कुटूंबात दि.८जानेवारी १९३३ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नांव रामचंद्र तर आईचे नांव सीताबाई असे होते. आई वडीलांचे शिक्षण झाले नसले तरी धार्मिक वृत्तीचे संस्कारी होते. त्यांना शिक्षणाच्या विषयी तळमळ आणि आवड होती. रामचंद्र सीताबाई यांना मुले व मुली सहा होते. घरची गरीब परिस्थितीतून रामचंद्र गवंडी काम करत असत.पुढे गवंडी काम मिळेनासे झाल्यानंतर कोळसा व चूना तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय करू लागले होते.काबाडकष्ट व दुर्गम जंगलातील रहिवास यामुळे वडीलांचा जंगलातील जंतू संसर्गजन्य आजाराने निधन झाले. विष्णुपंत लहान असतानाच वडील म्हणजे नाना कुटूंबाला सोडून गेल्याने दादा पोरके झाले. वडिलांच्या निधना समयी तिसरीत शिकत होते. वडिलांचे निधन झाल्यानंतर आई थोरली बहिण आणून मेव्हणे यांच्या आग्रहा मुळे जळगाव तालुका मालेगांव येथे राहण्यासाठी गेल्या आणि त्या ठिकाणी स्वतंत्र राहून मोल मजूरी करून उदरनिर्वाह करू लागले. विष्णुपंत यांचे काका म्हादू यांना मुलबाळ नव्हते. त्यामुळे विष्णुपंत शिरपूर येथे काकांच्या कडे राहून शिक्षण घेतले आणि १९४९ साली सातवी पास होऊन म्युनिसिपल हायस्कूलमध्ये आठवीत प्रवेश घेतला. त्या काळत हास्कूल शिक्षणासाठी फी माफी नव्हती त्यामुळे फी माफीसाठी विष्णुपंत यांना विनंती अर्ज केल्यानंतर फी माफी होत.अशाप्रकारचे विष्णुपंताचे शिक्षण काबाडकष्ट करीत चुलते कधी आत्या कधी मित्र कधी प्राचार्य यांच्या सहकार्याने झाले.ते अशा खडतर परिस्थितीतून मॅट्रीक पास झाले.हालाक्यात,उपासमारीत ते मैट्रिक परीक्षा पास झाले. मॅट्रीक परीक्षा पास झाल्यानंतर ते नाशिकला आत्यांचेकडे राहण्यासाठी गेले.नाशिक येथे त्यांना वायरमन वायरलेस टेलीग्राफ हे प्रशिक्षण पूर्ण केले.नंतर टेलिफोन खात्यात नोकरीसाठी रीतसर प्रयत्न केला परंतु त्यांना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे विष्णुपंत नाशिकहून कामधंदा करण्यासाठी मुंबईला आले. मुंबईत विष्णुपंत मोलमजुरी करून हाताने स्वयंपाक करुन राहू लागले. सुरत येथील साळीराम शंकर हळकर यांची कन्या इंदुमती हिच्याशी १९५५ साली विवाह झाला त्यानंतर त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळून विष्णुपंत १५ जून १९५५ रोजी टेलिफोन खात्यात अवघ्या दरमहा ९२ रु.पगाराच्या नोकरीस लागले विष्णुपंताना वाचनाची आवड होती. ते महात्मा जोतिबा फुले, आंबेडकर यांची पुस्तके वाचत.
आपले खडतर जीवन व ओढाताणीतील कसेबसे झालेले शिक्षण याची दादांनी जाणीव ठेवली व ओळखीच्या लोकांशी एकत्र बसून समाज सुधारणेबाबत चर्चा केली,त्यातूनच मुंबईकर आपल्या बांधवांना एकत्र करुन २५जून २९६१ रोज समाजाची पहिली बैठक घेतली आणि "लोणारी समाज सेवा संघ,मुंबई या संघाची १५ आगस्ट १९६१ रोजी स्थापना केली.त्यानंतर मुंबई आणि पंढरपूर येथे समाजासाठी समाज मंदिरे बांधली दि.२५/९/१९७० रोजी त्यांनी आटपाडी येथे वसतिगृहाची जागा खरेदी केली. दुष्काळी भागातील मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी विष्णुपंत रामचंद्र (लोणारी)दादरे निवासी माध्यमिक विद्यालय २००५ साली गुरूकुल नांवाने काढली. त्या ठिकाणी उत्तम निवासाची सोय,शैक्षणिक साधने,सुसज्ज ग्रंथालय, भव्य क्रीडांगण अनुभवी प्रशिक्षित अध्यापक वर्ग या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. लोणारी म्हणजे लोण म्हणजे मीठ निर्माण करून त्याचा व्यापार करणारा समाज तसेच लोणारी कोळसा आणि चूना निर्माण करणारा समाज होय.लोणारी समाज ,कुणबी, धनगर, सनगर, हटकर संलग्न समाज असून या समाजाची नोंद महाराष्ट्र सरकारच्या गॅजेटमध्ये नव्हती ती करण्यासाठी सतत प्रयत्न करुन समाजाच्या जेष्ठ नेत्यांच्या सहकार्याने आपल्या समाजाची नोंद इतर मागास वर्गात सन १९७० रोजी १८३ क्रमांकावर करून घेण्यात आली.तसेच मंडल आयोगाच्या १५२ क्रमांकावर नोंद करुन घेण्यात दादांचा सिंहाचा मोठा वाटा आहे. भारत सरकारने १ जानेवारी १९७९ रोजी खासदार बिंदश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली दूसरा मागास आयोग नेमला त्या आयोगाने ३१ डिसेंबर १९८० रोजी आपला अहवाल सरकारला ओबीसी वर्गाला चाळीस शिफारसी करुन सादर केला. मंडल आयोगाच्या शिफारसी अमलात आणण्यासाठी सतत मिळावे,बैठका आंदोलन केले.दादा ओबीसी संघटनेचे जनार्दन पाटील दि.बा.पाटील यांच्या बरोबर ओबीसी चळवळीत मोठे काम केले आहे. केल्याशिवाय मात्र दादा ओबीसी या समाजाच्या जातवारी वर्गावर समाधानी नव्हते.समाज अनुसूचित जातिमध्ये अथवा एन.टी.मध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न चालू ठेवले दादांनी राज्यातील सर्व भागात फिरून लोणारी समाजाला संघटित केले याबरोबर समाजाचे वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन सुद्दा केले दादानी अखेर ३० नोव्हेंबर २००९ रोजी नाशिक येथे अखेरचा श्वास घेतला.
दादांच्या या महान समाज कार्यासाठी समाज बांधवांनी त्यांच्या जयंती निमित्य विनम्र आदरांजली वाहिली यावेळी आण्णासाहेब हारगे, मल्लू औरसंगे,शिवाजी क्षीरसागर, रविंद्र सोलनकर, भारत क्षीरसागर, संतोष खिलारे,सौ.कमलाताई हारगे,नितीन नरळे,शर्मिला मुंजे,पांडूरंग पाटील, सुयोग मुंजे,अमोल बाबर आदि मान्यवर उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission