अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुंडगांव ह्या लहानश्या गावांमध्ये अतिशय सोज्वळ, प्रेमळ, सहृदयी व सर्वावर प्रेम करणारे एक आदर्श व महान व्यक्तीमत्वाचे धनी असलेल्या भाऊसाहेबांच्या दयाळू, मायाळू, निगर्वी व हृदयप्रेमी , निरागस मायेने ओतप्रोत भरलेल्या स्वभाव असणाऱ्या श्रीमती लक्ष्मीताई या दाम्पत्याच्या पोटी दिनांक २७ सप्टेंबर १९४८ रोजी सुधाकररावांच्या रूपाने नररत्न जन्माला आले.
“शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी” भाऊसाहेबांच्या व तसेच लक्ष्मीताईच्या ठिकाणी तसेच रत्न हिरे, माणिक, मोती जन्माला न येतील तर नवल ! "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.” याप्रमाणे सुधाकररावाबद्दल लहान पणापसुनच भव्य दिव्य व्यक्तीमत्व तयार होईल असे सर्वानाच वाटत होते. भाऊसाहेबांचे कुटुंब हे इतरांना हेवा वाटावा अस आदर्श कुटूंब मोठे बंधु व्यवहार दक्ष सर्वाबद्दल जिव्हाळा ठेवणारे श्री. प्रभाकरराव तसेच धाकटे बंधु श्री. सुरेश हे अत्यंत साध्या स्वभावाचे तसेच व्यवहार कुशल दक्ष व कुटूंबाच्या संपुर्ण व्यवहारावर लक्ष्य ठेवणारे त्याचप्रमाणे जेष्ठ भगिनी पंचफुलाताई जुनघरे व जयताई लोंडे व सर्वात धाकटी बहिण अँड. विजयाताई अडगोकार.
त्यांचे शिक्षण अकोट, अमरावती अकोला, नागपूर येथे होऊन महाविद्यालयीन निवडणुकीमध्ये सक्रीय सहभाग घेत असत . त्यांनी आपल्या राजकीय कौशल्याची व संघटन कौशल्याची जाणीव करून दिली व महाराष्ट्र एन. एस.यु. आय. चा पदभार सांभाळला. केवळ पदभारच सांभाळला नाही तर विद्यार्थी युवकांच्या समस्या सोडवून महाराष्ट्रातच नाही तर दिल्ली दरबारी त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली व तत्कालीन पंतप्रधान भारतरत्न इंदीरा गांधीना १९७२ मध्ये अकोला येथे महाराष्ट्र विद्यार्थी युवकांच्या मेळाव्याकरीता आणले.
बहुजन समाजातील युवकांची प्रगती व्हावी व अधिकार व कर्तव्याची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने १९७७ साली मुंडगाव येथे विदर्भ विभागीय माळी युवक मेळावा आयोजित करून त्यांनी संघटन कौशल्याची पावतीच दिली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतरावजी नाईकांनी रत्नपारख्याप्रमाणे मा. सुधाकरावजी पारख केली व त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेची व कार्यकुशल नेतृत्वाची धडाडी पाहन त्यांना आमदारकीचे तिकिट देण्यात आले व जनतेने सुद्धा या बहुजंनाचा कैवारी एक हृदयप्रेमी जिव्हाळ्याचा मित्र व भाऊ म्हणुन झोळी फाटेपर्यंत मते देवुन निवडुन दिले. जनतेने एवढे अमाप प्रेम संपादन करणारे एकमेव मा. सुधाकरराव असतील असे वाटते. परिवर्तनवादी व्यक्तींच्या प्रत्येक गोष्टीमधन परिवर्तन घडते. मा. सधाकरराव अकोटचे आमदार झाले अन अकोटतालक्याचा, शहराचा चेहरा मोहराच बदलन टाकला. अकोटचा विकास म्हणजे सुधाकरराव हेच समिकरण झाले. त्यांना बहुजनाविषयी अकोट तालुक्यातील जनतेविषयी इतके प्रेम होते की , रात्रंदिवस ते अकोट तालुका महाराष्ट्रातील सर्व तालुक्यामध्ये अग्रेसर कसे राहील ह्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. एक कपाट तर त्यांचे प्रोजेक्ट रिपोर्टने भरले होते. विविध योजना, औद्योगीक, संशोधने, शैक्षणिक क्षेत्र, आदिवासी भागामध्ये उद्योग इ. जेव्हा जेव्हा दिल्लीला जात होते. तेंव्हा त्यांच्या बँगमध्ये कपडे कमी प्रोजेक्ट रिपोर्ट जास्त रहात. जीवनाश्यक वस्तुंबद्दल कदाचित ते विचारत नव्हते. परंतू कारे बाबा त्या प्रोजेक्टचे फाईल बॅगेत टाकली ना ? अगदी अकोटच्या विकासाकरीता असा वेडापिसा होणारा आमदार मी सवतः च बघितला, अनुभवला विविध विकासाच्या योजनेसोबतच या भुमिपुत्राने बेरोजगार युवकांना रोजगार, तससेच शेतकऱ्यांना आपल्या कापसाला (पांढऱ्या सोन्याला) चांगला भाव मिळावा या उद्देशाने भगिरथी प्रयत्नाने तत्कालीन मा. मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर असतांना एक मोठी सुतगिरणी चालू केली होती. परंतु कालांतराने तिला ग्रहण लागले व ती बंद पडली. तेव्हा या प्रयत्नाला फार मोठा धक्का बसला परंतू अकोट येथील बेरोजगारांना खात्री आहे की आ. सुधाकरराव ती सुतगिरणी पुन्हा सुरू करतील.
त्यांचे तडफदार नेतृत्व व कार्यक्षमता लक्षात घेता त्यांना उर्जा राज्यमंत्री पद मिळाले होते. परंतु दुर्दैवाने मंत्री या नात्याने विकासाची कामे तसेच जनतेची कामे करण्याची संधी फक्त सहा महिनेच मिळाले. पद असो वा निष्ठा त्यांनी ढळू दिली नाही. रात्रंदिवस जनतेची कामे करण्याचा सपाटा त्यांनी सुरूच ठेवला. म्हणुनच सर्व बुहजन, दलित आदिवासी व अल्पसंख्याक जनतेच्या हृदयात आपल्या प्रेमाची ज्योत तेवत ठेवली. मंत्र्यापेक्षा आजही भाऊकडे काम करून घेण्याकरीता लोकांची रीघ लागलेली असते. ते संयम तसेच समतोल कधी सोडत नाही. सदैव हसतमुखाने येणाऱ्यांचे स्वागत करून आस्थेने विपचारपुस करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे.
माणसाला माणुस म्हणून माणूसकीची वागणूक देऊन बाबासाहेब आंबेडकराची शिकवण ते तंतोतंत आचरणात आणतात . महात्मा फुल्यांच्या विचाराने ते फारच प्रभावित आहेत. त्यांचे विचार आत्मसात करून आचरणात आणतात. छत्रपती राजर्षी शाहु महाराजांनी तेव्हा बहुजनाला हक्क, संरक्षण, आरक्षण, मिळवुन देण्याकरीता आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांचेच वारस म्हणुन बहुजनांवर अन्याय होऊ नये म्हणुन २७४ इतर मागांसवर्गीय जातीतील जनतेला शिष्यवृती, आरोग्य, न्याय मिळवुन देण्याच्या दृष्टीने दिनांक १० जुन २००२ ला महाराष्ट्र राज्य ओ.बी.सी संघर्ष समितीचे अध्यक्षम्हणुन मशाल त्यांनी हाती घेतली व महाराष्ट्रभर दौरे तथा मेळावे, धरणे, उपोषण करून बहुजनांना खऱ्या अर्थाने न्याय, संरक्षण आरक्षण, मिळवुन देण्याकरिता आपले आयुष्य खर्ची घातले. १२० कोटी रू. शिष्यवृत्तीची रक्कम मंजुर करून घेतली. त्या माध्यमातुन ओ.बी.सी. च्या मेडीकल, इंजिनिअर तसेच इतर शाखेच्या पदविधरांना शिक्षण घेणे सोपे झाले. म्हणुनच त्यांना बहुजनांचे कैवारी म्हणणे संयुक्तीक ठरते. आज प्राथमिक तथा माध्यमिक शाळेमधुन देशप्रेमाचे धडे तसेच वेळप्रसंगी देशाच्या रक्षणाकरीता बलिदान देणाऱ्या विचाराने प्रेरित होऊन अकोला येथे महत प्रयासाने नॅशनल मिल्ट्री स्कूलमध्ये देशाचे भावी सैनिक, इंजिनिअर, कर्नल, मेजर, लेफ्टनं तयार तयार होत आहेत. भाऊ कामामध्ये सदैव व्यस्त राहत असल्यामुळे व वाढत्या जबाबदारीमुळे सैनिक स्कुलवर लक्ष पुरवू शकत नसल्यामुळे सैनिक स्कूलची धरा सौ. सुरेखाताई भाऊंच्या खांदाला खांदा लाऊन पार पाडीत आहेत. भाऊच्या यशामध्ये व दैदिप्यमान प्रगतीमध्ये सौ. सुरेखाताईचा बरोबरीचा वाटा आहे. पतीची काळजी किती व कशी घ्यायची हे कोणीही सौ. सुरेखाताईकडुन शिकावे. त्यांची पाठशाळाच आहे. जेष्ठ सुकन्या गोंडस व लोभस तसेच शिक्षणाची आवड व हुशार असणारी अभियंता होत आहे. कनिष्ठ सुकन्या कु. मेघा ही डॉ. सुरेश यांचा वारसा चालविण्याच्या दृष्टीने होमिओपॅथिक डॉक्टर होत आहे. त्यांचे घरात प्रवेश केला तर फळाफुलांच्या तसेच निसर्गाच्या सान्निध्यात आहेत असे वाटते. बऱ्याच कालावधीनंतर मा. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांचे कर्तुत्व ओळखून त्यांना पुन्हा आमदार बनविचले व नंतर वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष म्हणुन मंत्र्यांचा दर्जा दिला होता. नागपूला त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली, की खरोखरच सुधाकरला काही देण्याकरीता आम्हाला बराच उशीर झाला हे त्यांच्या कार्यक्षमतेचेच प्रमाणपत्र त्यांनी दिले.
‘झाले बहु होतील बहु परी या सम हा' मा. सुधाकरराव त्यांच्या कार्यखमतेने व कर्तव्य तत्परतेने माणुस जुळविण्यामध्ये तर त्यांना डॉक्टरेट द्यायला पाहिजे . ते सामान्य कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी होता. आजारपणात भेटणे, लग्न समारंभात उपस्थित राहणे, कौटुंबिक कार्यात उपस्थित राहणे, दुःखप्रसंगी आर्थिक मदत करणे हा त्यांचा नैसर्गिक गुणधर्म आहे. त्यामुळे ते सामान्य कार्यकर्त्याच्या गळ्यातील ताईत बनले आहे. काही महिन्यापुर्वी दुर्देवाने त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांना सुद्धा मार लागला होता व तब्येत गंभीर स्वरूपाची होती. त्याही काळात मुंबईला त्यांच्या चाहत्यांची गर्दी भेटीसाठी उसळली होती. या परिस्थितीत सुद्धा लोकांचे कामे करण्याची प्रक्रीया चालूच होती. तसेच अकोला येथे सुद्धा त्यांचे निवासस्थांनी आले असे समजताच आतुतेने लोक भेटायला येतात व आपले सुख-दुःख समोर मांडतात. व त्याच प्रेमळ भवानेने ते काम करण्यात मग्न असतात.
मा. सुधाकररावजी महाराष्ट्राची धुरा सुद्धा सांभाळू शकतात. असा त्यांच्या हितचितकांचा ठाम विश्वास आहे. ईश्वर त्यांना जनतेची तसेच महाराष्ट्रातील बहुजन आदिवासी, ओ.बी.सी. दलित व सर्व धर्माची सेवा करण्याकरीता उत्तम आरोग्य प्रदान करो व दिर्घायुष्य देवो तसेच राजकीय भवितव्य उज्वल होवो हिच माझी एक हृदयप्रेमी म्हणुन ईश्वर चरणी प्रार्थना. व त्यांच्या कल्पनेतील ओ.बी. सी. साहीत्य संम्मेनाला शुभेच्छा.
मा. देवानंद गणोरकर, मधापूरी, जि. अकोला.
Satyashodhak, obc, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar