दि. २२ डिसेंबर नागपुर राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे दि २९ सप्टेंबर ला झालेल्या शासना च्या मुंबई येथील बैठकीत मांडलेल्या २२ मागण्या पैकी काही मागण्या सभेतच मंजूर करण्यात आल्या. उर्वरित १२ मागण्या पैकी ८ मागण्या १३डीसे. च्या बैठकीत मंजूर करण्यात आल्या केंद्र आणि राज्य समन्वयाच्या मागण्या बाबत पुढे निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन राज्य सरकारणे दिल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार त्यांचे निवासस्थानी जाऊन करण्यात आले. दि. २१ डीसे. ला उपमख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या प्रसंगी डॉ परिणय फुके उपस्थित होते, डॉ बबनराव तायवाडे ह्यांनी महासंघाच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांसमोर शासण ओबीसी मागण्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्या पुर्ण करतील असा आशावाद व्यक्त केला. उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे सुचक व्यक्त केले.
यापुढे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता इतर समाजाच्या बाबत सरकार निर्णय घेण्यास कटिबद्ध आहे या समन्वयाची धुरा माजी मंत्री तथा ओबीसी महासघांचे पाठीराखे मा डॉ परिणय फुके यांच्या सहकार्यातून योग घडविण्यात आला. ओबीसी विद्यार्थ्यांना ७२ पैकी ५२ मुलामुलींचे वस्तिगृह जानेवारी ३१ पर्यंत सुरू होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वस्तिगृहात प्रवेश मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करण्यात आली आहे. यात शहरी विद्यार्थ्यांना ६००००रु, निमशहरी विद्यार्थ्यांना ५१०००रु तसेच जिल्हास्तरीय विद्यार्थ्यांना ४८०००र आणि तालुकास्तरीय विद्यार्थ्यांना ३८०००रु मिळणार आहेत. महाज्योती योजनेत ३७८कोटी रु ची वाढ करण्यात आली असून, योजनेच्या लाभासाठी फक्त नॉन क्रीमी लेअरची अट लागू राहील, बिसीए, एमसीए ई. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली असून. घरकुल योजनेत ओबीसी नां आरक्षण प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेत आता ओबीसी आरक्षण लागू झाले आहे. यापुढे ही ओबीसी च्या मागण्या बाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा ओबीसी महासंघाच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला ओबीसी महासंघाचे अनेक महिला, पुरुष, विद्यार्थी, आणि विविध कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.