देऊळगावराजा - आज मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात रान पेटवल्या जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची देखील भूमिका आहे. मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. जर मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर याचे गंभीर परिणाम सरकारला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भोगावे लागतील असा गर्भित इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील असोला येथील शेतकरी मेळाव्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलतांना दिला. या देशात जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र जातनिहाय जनगणनेला विरोध केला आहे. ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी ओबीसी जातीमधील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी एक पाऊल पुढे असणार आहे. एकीकडे आपण आरक्षण टिकविण्यासाठी लढा उभारत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात खाजगीकरण करण्यावर भर दिला आहे. सर्व क्षेत्रात खाजगीकरण झाले तर या आरक्षणाचा उपयोग तरी काय असणार आहे, असे देखील यावेळी महादेव जानकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ अध्यक्ष प्रा. विदर्भ उपाध्यक्ष तथा अमरावती विभागाचे विभागीय अध्यक्ष डॉ. तौसीफ शेख, बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर डोईफोडे, अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गणेश मानकर यवतमाळ पत्रकार सुनील मतकर, जिल्हा संपर्कप्रमुख बुलढाणा अतुलमाऊ मुसारी पाटील महिला अध्यक्ष तारामती जायभाये, सिंदखेडराजा तालुका संतोष अध्यक्ष बनवे, जिल्हाउपाध्यक्ष राजू चोव्हाण, तालुखा अध्यक्ष उमेश इच्चे तालुखा प्रमुख सुनील मांटे, विद्यार्थी युवक आघाडी तालुकाध्यक्ष वैभव मांटे युवक आघाडी उपाध्यक्ष तालुका सचिन 'चित्तेकर, सोशल मीडिया तालुखा अध्यक्ष योगेश मांटे, तसेच अनिल पवार यांच्या समवेत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रभाकर डोईफोडे व असोला जहागीर येथील गावकरी मंडळी यांनी केले होते.