भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालीत पण भारतीयांची परिस्थिती इंग्रज राजवटीपेक्षाही वाईट देशातील राज्यकर्त्यांनी केलेली आहे. देशातील शेतकरी व तरुण आत्महत्या करतो, तरुण बेरोजगार आहेत.खाजगिकरणाच्या माध्यमातून आरक्षणाची विल्हेवाट लावण्यात आली. नागरिकांना प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. राज्यातील 62000 शाळा शासन बंद पाडत आहेत. ओबीसीची जनगणना व 72 वसतिगृहाचा प्रश्न कायम आहे.लोकसभा मध्ये 33% महिलांना आरक्षण दिले,पण ओबीसी महिलांना त्यात वाटा दिला नाही. महाराष्ट्रात बियरची विक्री कमी का होते? यासाठी महाराष्ट्र शासनाने 5 IAS अधिकाऱ्यांची समिती नेमली, पण सरकारी शाळेत पटसंख्या कमी का होत आहे ? या संबंधात सरकारने एकाही अधिकाऱ्यांची समिती नेमली नाही. गरिबी, भूकमरी, कुपोषण ह्या समस्या आतापर्यंत संपल्या नाहीत.असे मत जगदिश वाडिभस्मे यांनी मांडले.
याप्रसंगी जगदिश वाडिभस्मे प्रमुख वक्ते व पाहुणे म्हणून तर अध्यक्ष म्हणून राहुल मडामे उपस्थित होते.दीप प्रजलन जितेंद्र सोमकुवर,मूलचंद बोमले यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून विनय वाघमारे,रितेश बनसोड उपस्थित होते. 1 जानेवारी 2024 सोमवारला आदर्श नगर,राणी दुर्गावती चौक,नागपूर येथे विजय स्तंभ व 500 शुरवीरांना मानवंदना देण्यात आली. आणि महापुरुषांना अभिवादन करून प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम आदर्श नगर मित्र मंडळ, राणी दुर्गावती चौक,नागपूर मार्फत आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन चैतन्य मसुरकर यांनी केले. तसेच संदीप चव्हाण,सुमित कोटांगले,अमोल गोखे,पंकज कोटांगले,रोशन साखरे,सुभाष कुट्टरमारे व आदर्श नगर मधील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.