महाज्योती संशोधक विद्यार्थी आंदोलनाला ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचा जाहीर पाठिंबा

    छत्रपती संभाजीनगर : महाज्योतीतर्फे संशोधक विद्यार्थ्यांना पी.एच.डी. छात्रवृत्तीची (MJPRF) रक्कम महाराष्ट्र सरकाकडून पात्र १२२६ विद्यार्थ्यांना अद्यापही मिळाली नाही. तसेच ही योजना विद्यापीठात पी.एच.डी. नोंदणी दिनांकापासून मिळण्यासाठी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीच्यावतीने छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक न्याय विभाग कार्यालयासमोर गेल्या सोमवार पासून आमरण उपोषण सुरु आहे. या लढवय्या विद्यार्थ्यांना ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ जाहीर पाठिंबा दिला आहे. सोबतच ओबीसी कार्यकर्ते व ओबीसी विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन पाठींबा द्यावा, असे आवाहन करण्यात येते.

mahajyoti sanshodhk Vidyarthi Andolan Lala OBC Adhikari karmchari Sangh jahir pathimba    यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रभारी संतोष ताठे, अहमदनगर जिल्हाप्रभारी रामदास डोईफोडे, सिनेट सदस्य आनंद वाघ, उल्हास ढेपले, अंबादास गीते, महेंद्र बारवाल,  संजय  देव्हरे, संजय बुचूडे, विजय ढाकरे, अनिल निलंगे,  चंद्रकांत सूक्ते, पांडुरंग बाचकर,दिलीप गोरे, कैलास व्यवहारे, श्रीराम काथार, जगन ढोके, रमेश नप्ते, अनिल काळे, गणेश धनवई, महावितरणचे अण्णा ताठे, आदी ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.

    महाज्योतीच्या योजनेसाठी २०२२ मध्ये अर्ज केलेल्या संशोधकांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण करण्यात आली. व १२२६ विद्यार्थ्यांना अवॉर्ड लेटर सुद्धा प्रदान करण्यात आले. २०२२ च्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याची प्रोग्रेस रिपोर्ट व इतर प्रमाणपत्र/अधिछात्रवृत्ती जमाकरण्यासाठी जानेवारी महिन्यात मागवली होती. तरी आता ६ महिने उलटून  एकही संशोधकाला अधिछात्रवृत्ती भेटली नाही. उपमुख्यमंत्री यांनी स्वतः अधिवेशना दरम्यान घोषणा  केली होती की, आम्ही महाज्योतीच्या सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देणार. मात्र, ही घोषणा अजून ही कोरडीच घोषणाच ठरत आहे. सदर उपोषणाला ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ, ऑल इंडिया पँथर सेना, सारथी संशोधन कृती समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व  अनेक सामाजिक संघटनच्या सदस्यांनी उपस्थित राहून पाठिंबा जाहीर केला आहे. तर राष्ट्रवादीचे सुनील गव्हाणे यांनी पात्र द्वारे पाठिंबा जाहीर केला. आपण सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात येते.

Public support of OBC Officers Staff Union to Mahajyoti Research Student Movement

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209