कॉग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी हे ओबीसी विरोधी आहेत असा भाजपा चुकीचा प्रचार करीत असून या उलट भाजप आणि संघ परिवार ओबीसींचे खरे शत्रु आहेत ?

 तुकाराम माळी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग

     सांगली दि.२६ मार्च २०२३ -  सर्वसामान्य माणसाच्या मनातला न्यायव्यवस्थेबद्दलचा आदर संपवण्याचा विडा मोदी सरकारने उचलला आहे हे आता सुर्यप्रकाशा एवढे स्पष्ट झाले आहे

      राहूल गांधी यांनी  कर्नाटकात कोलार येथी २०१९ साली केलेल्या एका भाषणावरुन  गुजरात मधील सुरतमध्ये एक अब्रुनुकसानीचा खटला दाखल झाला होता.त्या भाषणात,नरेंद्र मोदी,नीरव मोदी, ललित मोदी या तीन लोकांच्या विरोधात भ्रष्टाचारी म्हणून वक्तव्ये राहूलजी गांधी यांनी केली होती .

       त्या तिघांपैकी कोणीही ही फिर्याद दाखल केली नव्हती ,कोणातरी चौथ्याच माणसाने ही फिर्याद दाखल केली होती

     सुरतेच्या ज्या कोर्टात हा खटला प्रलंबीत होता त्या  फिर्यादीचाच उच्च न्यायालयात एक रिट याचीका दाखल करून खटल्याला स्थगिती मिळवली होती

     पूर्वीच्या न्यायाधीशांची बदली झाल्याबरोबर रिट याचीका मागे घेण्यात आली कर्नाटकातल्या कोलार गावात केलेल्या भाषणावरुन सुरतमध्ये कोणाची अब्रुनुकसानी कशी झाली हे न्यायाधीश नक्कीच विचारु शकतात ज्यांनी हे भाषण दिले त्यांच्या मनात आकस अथवा पूर्वग्रह होते याला काय पुरावा नाही.

    अशा प्रकारे घाई गडबडीत दिलेल्या निकालात जास्तीत जास्त दोन वर्षाची शिक्षा दिल्याने एवढा मोठा अनर्थ घडून राहुलजी यांच्यावर अन्याय झाला असल्याने केंद्र सरकारने चौकशी करून  दुरूस्ती केली पाहिजे.आपली न्याय व्यवस्था निकोप असल्याचे दाखवून द्यावे. काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांनी उद्योगपती अदाणी यांच्या व्यवसायात वीस हजार कोटी रूपये कोणाचे आहेत याचे उत्तर मोदी यांना देता आले नाही तसेच देशाचे पैसे घेऊन पळालेल्या मोदींबद्दल चोर असे विधान केले होते परंतू भाजपचा खरा मुखवटा जनतेसमोर येऊ नये म्हणून त्यांनी ओबीसी समाजाचा आधार घेत देशांमध्ये ओबीसी समाजाचा अपमान झाला म्हणून महाराष्ट्र मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात जे आंदोलन पुकारले आहे ते चुकीचे असून मोदी हे ओबीसी नसून ओबीसींचे खरे शत्रू संघ व भाजपा हेच आहेत.

BJP is spreading false propaganda that Congress party leader Rahulji Gandhi is anti-OBC on the contrary BJP and Sangh Parivar are real enemies of OBC   ओबीसी समाजाचे महाराष्ट्र राज्यातील काँग्रेस नेते डॉ.पंजाबराव देशमुख हे अखिल भारतीय पिछडा वर्गाचे अध्यक्ष या नात्यानें दूसरे ओबीसी नेते राम लखन चंदापूरी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दिल्ली येथे १९४८ साली भेटून घटनेत ओबीसींसाठी ३४० व्या कलमाची तरतूद करून घेतली. त्यानुसार १जानवारी १९७९ साली मंडल आयोग नेमन्यात आला. आणि या आयोगाने ३१ डिसेंबर १९८० रोजी ओबीसी समाजासाठी चांगल्या शिफारशी करून सरकारला सुपुर्द केला. ७ आगस्ट १९९० साली तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी मंडल आयोग लागू केला. तेव्हा संघ प्रचारक नरेंद्र मोदी आणि त्यांचे गुरु लालकृष्ण आडवाणी यांनी रथ यात्रा काढून मंडल आयोगाच्या विरोधात व्ही.पी.सिंग सरकार पाडले. नंतर प्रकरण केद्र सरकार विरुद्ध इंद्रा सहाणी असे न्यायप्रविष्ट होऊन नऊ न्यायाधीश घटनापिटापुढे सहा विरुद्ध तीन असे १६ नोव्हेंबर १९९२ रोजी मंजूर झाले. तरी संघ भाजपने ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशिद पाडुन देशात गोंधळ निर्माण करुन आर्थिक सामाजिक क्षेत्रात कधीही न भरून येणारे नुकसान केले. सन १९९४ साली महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी प्रवर्गासाठी २७ आरक्षण दिले. १९९७ साली केंद्रातील देवगौडा सरकारने या पुढील जनगणना जातनिहाय करण्याचा निर्णय घेतला तो पुढील भाजप वाजपेयी सरकारने बदलला. सन २०११ साली मनमोहनसिंग सरकारने केलेल्या सामाजिक, आर्थिक, जात  जनगणनेतील आकडेवारीचा इंपरिकल डेटा राज्य सरकाराना दिला नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या.तसेच काही स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक होवु शकल्या नाहीत. राज्यातील एकनाथ खडसे, पंकजा मुंडे,प्रितम मुंढे, बावन्नकुळे आदी ओबीसी नेत्याना  भाजप कोणती वागणुक देते हे राज्यातील ओबीसी समाजाला चांगले माहित आहे. देशातील ओबीसी नेते लालूप्रसाद यादव ,सिद्धरामहया  यांनी ओबीसी समाजासाठी उल्लेखनीय कार्य केले असून हे नेते भाजपच्या सावलीला सुद्धां उभारत नाहीत.त्यांचे सोनियाजी,राहुलजी यांच्या विषयी फार चांगले मत आहे. विनाकारण भाजपा ओबीसी समाजाच्या पाठीमागे दडु नये. आज देशातील अनेक राज्यात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ओबीसी आहेत. काँग्रेस पक्षाने पुढील काळात ओबीसी समाजाला अनेक योजना घोषित केले आहेत. आणि आज देशात संघ आणि मोदीजी यांच्या चुकीचं  धोरणामुळे देशात बेरोजगारी, महागाई, सामाजिक विषमता वाढल्याने राहुलजी देशाचे नुकसान टाळण्यासाठी मोदीजींना विरोधी पक्षाचे प्रमुख म्हणून संसदेत आणि संसदे बाहेर विरोध करतात.

BJP and Sangh Parivar are real enemies of OBC    राहुल गांधी यांनी संसदेमध्ये भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे हा प्रकार लोकशाहीसाठी घातक असून भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामधील अत्यंत काळा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे.

    आजपर्यंत ओबीसींच्या हितासाठी आणि आरक्षणासाठी काँग्रेस हा एकमेव पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे आणि ओबीसींची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे आंदोलन अजून तीव्र होऊ नये यासाठी भाजपने हे षडयंत्र रचले आहे परंतु ओबीसी भाजपच्या भूलथापांना बळी पडणार नाही, त्यामुळे भाजपने जे  बेगडी आंदोलन चालू केले आहे ते त्वरित थांबवावे अन्यथा ओबीसी काँग्रेसकडून संपूर्ण देशभर आंदोलन छेडून भाजपचे पर्दाफाश करण्यात येईल. असे सांगली जिल्हा कॉग्रेस कमेटी आयोजित आंदोलनात  तुकाराम माळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग उपाध्यक्ष म्हणाले.

    यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष विशालदादा पाटील, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष विक्रमसिंह दादा सावंत, श्रीमती जयश्रीताई मदन पाटील वहिनी, बाबासाहेब कोडग,सुभाष खोत,अजित ढोले,सौ. मालन मोहिते,अशोकसिंग राजपुत, आशिष कोरी,देशभुषण पाटील, पैंगबर शेख, मोहनराव माने पाटील,आकाश बनसोडे आदी उपस्थित होत.

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209