जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने धार्मिक सद्भावना बैठक संपन्न

     जत दि.८ मार्च २०२३ देशात धार्मिक भाईचारा वाढावा तसेच सहिष्णुता निर्माण व्हावी तसेच येथील प्रस्थापित व्यवस्था ओबीसी, एस्सी,एसटी,अल्पसंख्यांक यांना चांगल्या शिक्षणापासून वंचीत ठेवून त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन राजकीय स्वार्थासाठी तेड निर्माण करण्याचे उद्योग देशांत सुरु आहेत. जत तालुका ओबीसी संघटना विविध उपक्रम राबवून प्रस्थापितांच्या मगर मिठीतून ओबीसी समाजाला बाहेर काढण्याचे कार्य  अखंडित सुरु आहे आणि त्याला ओबीसी वंचित वर्गाचा प्रतिसाद चांगला मिळत आहे.गेली काही वर्षे झाले देशात सत्ता संपत्ती याचा उपयोग करुन धार्मिक तेड निर्माण करण्याचे काम छुपे पध्दतीने सुरु असून त्याला अज्ञानाच्या आहारी जाऊन ओबीसी वर्ग बळी पडतो.म्हणून या क्षेत्रातील तज्ञ सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चासत्र आयोजित करण्यात आले.देशाचे संविधान निर्माण करताना धर्मनिरपेक्ष निर्माण केले.त्यात स्वातंत्र्य, समता,न्याय,बंधुभाव या तत्वान महत्व देण्यात आले. परंतू आज देशात घटनेतील मुलभूत तत्वांची पायमल्ली करून ओबीसी प्रवर्गाचे शोषण सुरु आहे.आज सत्तेवर असलेल्या विचार शक्तीना भारतीय संविधान बदलून मनुस्मृतीला पुनर्जन्म देण्यासाठी  कार्य करीत आहेत. संविधान निर्मात्यांनी जरी आपले संविधान धर्मनिरपेक्ष निर्माण केले असले तरी आपल्याला कोणताही धर्म आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.आज प्रत्येक ओबीसींनी आपले मित्र आणि शत्रू ओळखून कार्यरत राहिले पाहिजे. सर्व धर्माचे एकच उद्दिष्ट असते. पूजा पध्दती वेगळ्या असतात.यासाठी देशातील थोर तत्वज्ञानी स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी सर्व धर्म आचरण करुन आदर्श निर्माण केला.

Jath Taluka OBC sanghatana Dharmik Sadbhavna baithak    देशात निकोप लोकशाहीसाठी चांगले शिक्षण सर्वांना मिळाले पाहिजे.सच्चर आयोगाच्या सर्व शिफारशी सरकारने मंजूर करून लागू  केल्या पाहिजेत.. यावेळी सलीम शेख यांनी इस्लाम धर्माबद्दल माहिती सांगितली. भारतातील मुस्लिम हा देशातील मूळनिवाशी ओबीसी असून इस्लाम धर्म स्विकारला आहे. म्हणून सर्व ओबीसी वर्गानी एकत्रित संघटित राहून काम केल्यास देश बळकट होऊन सर्वांना न्याय मिळेल.

   आभार मुबारक नदाफ यांनी मानले. यावेळी सलीम शेख, तुकाराम मळी, मुबारक नदाफ, रविंद्र सोलनकर, आशिष मुजावर, हिजाद कादरी, सुरेस पेड, शफी इनामदार, हाजीसाहेब हुजरे, नाशिककर सर, रियाज मुल्ला (मौलाना), सागर शृंगारे, चंद्रकांत बंडगर, आदी उपस्थित होते.

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209