नागपूर शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत, तसेच सेवादल शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्याना ज्ञानदान देणारे स्मृतिशेष केशवरावजी शेंडे यांच्या अस्थिंचे श्रीगुरूदेव मानव मंदिर, कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृति शांतीवन येरला (फेटरी) जि. नागपूर येथील निसर्गरम्य परिसरात निर्मीत 'श्रीगुरूदेव सुसंस्कार अस्थिकुंडात' गुरुवारी विसर्जन करण्यात आले. त्याआधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजने, सामुदायिक प्रार्थना करून ग्रामगीतेच्या अंत्यसंस्कारासंबधी ओव्या वाचण्यात आल्या. याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारेचे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक यांनी मृत्युसंस्कार याविषयी विचार प्रबोधन केले. केशवराव शेंडे यांचा मुलगा संजय शेंडे जे अंधश्रध्दा निमृलन चळवळीत कार्यरत आहे. त्यांच्या कल्पनेतून हा अस्थिविसर्जन श्रध्दांजली सोहळा पार पडला. याप्रसंगी केशवराव शेंडे यांचे आप्तजन आवर्जून उपस्थित होते. आई-वडीलांच्या सुसंस्काराला जपण्याचा संकल्प हाच खरा मृत्यु- संस्कार असल्याचे ज्ञानेश्वर रक्षक यांनी सांगितले, राष्ट्रसंत ग्रामगीतेत लिहीतात, मृत्यु संस्काराचा ऐका खुलासा लोक मृत्युसि समजती भलतिसा मी म्हणतो मृत्यू जैसा, उत्तम नाही कोणीही, मृत्यु सारखा मित्र नाही. पण आपल्या आपतांच्या मृत्युसंस्कारालाही घाबरतो. आई-वडिलांच्या सुसंस्काराला जपण्याचा संकल्प करणे हाच खरा मृत्युसंस्कार आहे, असे परखड मत ज्ञानेश्वर रक्षकांनी अनेक संताच्या साहित्याचे पुरावे देत सांगीतले.