जिवंतपणी माणसाचा मानसन्मान करणे गरजेचे आहे. त्याच्यावर प्रेम करणे गरजेचे आहे. माणसाच्या मृत्यूनंतर मेल्यानंतर स्वर्ग, नरक है सर्व थोतांड असल्याची टीका प्रसिध्द विचारवंत श्रीमंत कोकाटे यांनी केली. दिघंची येथे आयोजित कार्यक्रमात श्रीमंत कोकाटे बोलत होते.
यावेळी कै. अण्णासाहेब रणदिवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ते पुढे म्हणाले, शिक्षण काळाची गरज आहे, परंतु शिक्षणावर माणसाची गुणवत्ता ठरत नाही. राजकारणात काम करणारी अनेक मोठी माणसे होऊन गेली. त्यांचे शिक्षण कमी होते, परंतु त्यांनी राज्याचा कार्यभार चांगल्या प्रकारे सांभाळला आहे.
यावेळी प्रास्तविक अरुण वाघमारे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार राष्ट्रवादीचे नेते विलासराव शिंदे, हणमंतराव देशमुख, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रणव गुरव, हरी पवार, ज्येष्ठ नेते बळी अण्णा मोरे, बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सावंता पुसावळे, युवा नेते अविनाश रणदिवे, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्धन झिंबल, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, दीपक रणदिवे आदी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan