सिंदखेडराजा शहरातील प्रांतिक तौलिक महासभेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा.गोविंद सोनुने यांच्या घरी तालुका अध्यक्ष मा.विजय सोनुने यांच्या पुढाकाराने बैठक संपन्न झाली.उपस्थित तेली समाज बांधव, तरुण ओबीसी बांधवांना जातनिहाय जनगणना 2021 का करून घ्यायची ? त्यासाठीची जनजागृती मा. तुळशिरामजी सोनुने, मा. सुनिलभाऊभाऊ सोनुने, मा.लक्ष्मण लीबांजी शिंदे, मा.संतोष लक्ष्मण शिंदे,मा.गजानन सोनटक्के, मा. अशोक सोनुने, मा. रवि सोनुने, मा, कैलास धडके, मा संतोष ज्ञानेश्वर शिंदे, मा, गोविंद सोनुने, मा. ठकाजी तिडके, मा. डॉ. भिमराव म्हस्के, मा, विजय सोनुने (पञकार,) मौर्य आकाश मेहेत्रे सर व असंख्य तरुण हजर होते. सर्वांनी ओबीसी जातनिहाय जनगणना 2021- जनजागृती करण्यासाठी व 24 जुलै 2022 रोजी "ओबीसी जातनिहाय जनगणना व राष्ट्रीय परिणाम" विषयावर आयोजित मा. आर. एस यादव सरांच्या प्रशिक्षण शिबीर व प्रश्नोत्तर वर्गाचे निमंत्रण देवून जनजागृती काॅर्नर मिटींग संपन्न केली. रविवारच्या प्रशिक्षण वर्गासाठी बांधवांनी आपल्या कामांचे नियोजन करून 2 ते 3 तासाचा वेळ राखून ठेवून आपल्या आत्ताच्या व पुढच्या पिढीसाठी हजर राहून ओबीसी जातनिहाय जनगणना 2021 का गरजेची आहे ते समजून घ्यावे. मनातील प्रश्न विचारावे.
जय ओबीसी जय संविधान