धर्माच्या झुंडीपासून मानवतेला धोका - शरद गोरे

     नारायणगाव : धर्माच्या झुंडीपासून मानवतेला धोका आहे, धर्माच्या नावावर अधर्म जोर धरत आहे त्यामुळे सामाजिक दुफळी निर्माण होऊन माणसं एकमेकांपासून दुरावून विषमतेची दरी वाढत असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे यांनी व्यक्त केले, डोंबिवली येथे 2 र्या पी,सावळाराम साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते,साहित्याचा केंद्रबिंदू हा माणूस असला पाहिजे, जाती धर्माच्या पलीकडे वैश्विक तत्वज्ञानच जगाला पुन्हा समता व शांतता देऊ शकेल असे मत गोरे यांनी या प्रसगी मांडले,साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीतून एकसंध समाजासाठी लिखाण करणे आवश्यक आहे,तरच साहित्याला दुदैर्वाने विचारशुन्यतेचे लागलेले ग्रहण दूर होईल व विश्वशांती पुन्हा नव्याने उदयास येईल असा आशावाद हि गोरे यांनी या प्रंसगी व्यक्त केले,

A threat to humanity from the herd of religion - Sharad Gore     अखिल भारतीय मराठी साहित्य मुंबई प्रदेशने या संमेलनाचे आयोजन केले होते ,संमेलनाध्यक्ष राजश्री बोहरा, स्वागताध्यक्ष अनिता गुजर, नगरसेवक बाबाजी पाटील, ज्येष्ठ पत्रकार आत्मलिंग शेटे,फुलचंद नागटिळक, अविनाश ठाकूर, नवनाथ ठाकूर, मुग्धा कुंटे, राधिका बापट, डॉ.मीना बद्रापुरकर आदीजण उपस्थित होते, एक दिवसीय या साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथपूजनाने झाली,काही पुस्तकांचे पुस्तक प्रकाशन झाले,विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, राज्यातील 88 साहित्यिकांनी या साहित्य संमेलनात सहभाग नोंदवला,मोठया संख्येने रसिकांनी संमेलनास हजेरी लावली होती.

 

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209