औरंगाबाद महापालिकेने शहरातील ओबीसींची. गणना करण्याचे काम 'झटपट' पूर्ण केले. मतदारयाद्यांच्या आधारे आडनावांवरून ही गणना करण्यात . आली. त्यात औरंगाबादेत ओबीसी लोकसंख्येचे प्रमाण १८ % आढळून आले.या अहवालाला अंतिम स्वरूप दिले जात असून तो मंगळवारी किंवा बुधवारी शासनाला सादर होईल. . स्थानिक स्वराज्य संस्थांमधील . ओबीसींचे आरक्षण पुन्हा बहाल करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी माजी मुख्य सचिव जयंत बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र आयोग नियुक्त करण्यात आला आहे. या आयोगाला माहिती देण्यासाठी राज्यात सर्वेक्षण केले जात आहे. . मनपाच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील सर्व ८८० बूथवर बीएलओंच्या माध्यमातून सर्वेक्षण केले. स्थानिकांची मदत घेऊन मतदार याद्यांमधील आडनावांवरून त्या केंद्रावरील किती मतदार ओबीसी आहेत हे शोधण्यात आले. आता या अहवालाला अंतिम स्वरूप दिले जात आहे.