समर्पित आयोगापुढे  महाराष्ट्र प्रांतिक तैलीक व ओ.बी.सी परिषद दिल्लीची ओबीसी बाबत कोकण विभागा बाबत ठोस भूमिका - डॉ सतीश वैरागी

डॉ सतीश वैरागी यांनी राऊंड डाईज सभेमध्ये श्री बांढीया आयोगापुढे महाराष्ट्र प्रांतिक तैलीक व ओ.बी.सी परिषद दिल्लीची ओबीसी बाबत कोकण विभागा बाबत ठोस भूमिका

    ओबीसी राजकीय आरक्षण बाबतीत समर्पित आयोग गठीत करण्यात आलेला आहे.या आयोगाच्या माध्यमातून  बुधवार दिनांक २५ मे २०२२ रोजी कोकण भवन, बेलापूर, नवीमुंबई येथे सुनावणी आणि सुचना व निवेदन देण्यासाठी  महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मुंबई तसेच ठाणे,नवी मुंबई, ,पनवेल, तसेच विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सूचना व निवेदन सादर करण्यात आले. त्यावेळी उपस्थित OBC हक्क परिषद दिल्ली,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोकण विभाग अध्यक्ष श्री सतीश वैरागी यांना सभेमध्ये एक वैयक्तिक आपले मत मांडत असताना बोलून गेले की बऱ्याच जाती OBC आरक्षण  हक्क बाबद लक्ष घालत नाही.त्यावर आक्षेप घेत त्यांचा मुद्दा खोडून टाकला तेली समाज सुध्दा जातीने लक्ष घालून 33 तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत .आमचे तेली समाजाचे माझी ऊर्जा मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, मा. श्री विजय वडेट्टीवार, माननीय, श्री. गजानन शेलार,माननीय, श्री. भूषण कर्डिले, श्री अशोक काका व्यवहारे श्री नरेंद्र चौधरी श्री सुभाष पन्हाळे श्री सुनील चौधरी  श्री प्रदीप फाले  (दिल्ली) यांनी कोणत्या एका पक्षाचा विचार न करता वारंवार OBC लढ्यात सहभागी होते.पुढे बोलताना श्री सतीश वैरागी यांनी  कोकणचा रहिवाशी अत्यंत गरीब परिस्थितीतून जात आहे.त्यामुळे तो रहिवाशी मुंबई येथे कामानिमित्त स्थलांतर करत करीत आहे.कोकणात अनियमित पाऊस,वारंवार नैसर्गिक आपत्ती त्यामुळे तेथील लोकांना शेती सुध्दा परवडत नाही.तसेच शैक्षणिक बाबतीत कोणतीही सवलत मिळत नसल्याने व्यवस्थित शिक्षण घेता येत नाही.आरक्षण नसल्यामुळे नोकरी मिळत नाही.मिळाली तर बढती मिळत नाही.श्री.सतीश वैरागी यांनी स्वतःचे उदाहरण देऊन सांगितले की आरक्षण वाला व्यक्ती कमी शिक्षण असून आपल्या पेक्षा मोठ्या हुद्यावर आहे .तेली समाज डोंगरात विखुरलेला आहे तुम्ही आमच्या भावना समजून घेऊन त्यांना न्याय देण्याची विनंती केली . व हा प्रश्न मार्गी लावावा असे निवेदन दिले .त्याप्रसंगी उपस्थित श्री बांढीया सरांनी  श्री.सतीश वैरागी तेणा वैयक्तिक भेटीसाठी आपल्या केबिनमध्ये बोलावलं कोकण विभाग  ओ.बी.सी आरक्षणाबद्दल चर्चा करण्यात आली त्यावेळेस खालील प्रमाणे निवेदन देताना तेली समाज बांधव उपस्थित होते उपस्थित होते मुंबई विभाग महिला सौ. रोहिणीताई महाडिक, सचिव श्री. जयवंत काळे, श्री. प्रफुल खानविलकर, ठाणे विभाग अध्यक्ष श्री. सुनील चौधरी साहेब, श्री. नाना सुर्यवंशी,श्री.भूषण चौधरी,श्री. कृणाल महाडिक कोकण विभाग अध्यक्ष श्री. सतीश वैरागी साहेब, कोकण विभाग कार्याध्यक्ष श्री. गणेश धोत्रे, नवी मुंबई विभाग अध्यक्ष श्री. राजेंद्र रहाटे, श्री किरण अंब्रे,श्री. रविंद्र राणे, श्री.गजानन शेलार,
कोकण विभाग युवा अध्यक्ष श्री संतोष रहाटे कोकण विभाग युवा कार्याध्यक्ष  विखारे गोठणे येथील श्री.नीतीन  खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

OBC Parishad Delhi and maharashtra prantik tailik mahasabha give Statement to samarpit Aayog

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209