लातूर, ता. २३ : मध्यप्रदेश सरकारने ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण देण्यासाठी केलेल्या कृतीचे अनुकरण करून राज्य सरकारनेही तातडीने हालचाली करून ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण परत मिळवून द्यावे, या मागणीसाठी तसेच सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने सोमवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेशअप्पा कराड, आमदार अभिमन्यू पवार, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, प्रदेशाचे अमोल पाटील, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, ओबीसी मोर्चाचे मराठवाडा संपर्क प्रमुख बाबासाहेब घुले, जिल्हा भाजपाचे संतोष मुक्ता, भागवत सोट, अनिल भिसे, हनुमंत नागटिळक, बालाजी पाटील चाकूरकर, अरविंद नागरगोजे, बस्वराज रोडगे, बन्सी भिसे, शिवाजी बैनगिरे, सुभाष जाधव, सुरेंद्र गोडभरले, महेश पाटील, वसंत करमुडे, उषा रोडगे, संध्या जैन, अरविंद सुरकुटे, देवा गडदे, अनंत चव्हाण, आदिनाथ मुळे, शिवसिंह सिसोदिया, अनंत कणसे, राजकिरण साठे, बापूराव बिडवे, विजय चव्हाण, उषा शिंदे, लता भोसले, गुणवंत करंडे, महादेव मुळे, दिनकर राठोड, समाधान कदम, राहुल लोखंडे, अशोक सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारमुळे आरक्षण रद्द झाले असून मध्यप्रदेश सरकारमुळे आरक्षणासाठी पुन्हा आशेचा किरण निर्माण झाला आहे. मध्यप्रदेश सरकार करू शकते तर महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही० सरकारला आरक्षण देण्याची इच्छाच नाही का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात आले. ओबीसींचे लोकप्रतिनिधी पुरेशा संख्येने नसल्याने त्यांचा आवाज दाबला जात असून आता संसद व विधीमंडळात ओबीसी आरक्षण लागू करावे, अशी मागणीही करण्यात आली. या वेळी आमदार पवार,श्री. देशमुख, श्री. राठोड, भागवत सोट, महेश पाटील, संध्या जैन, श्रीमंत नागरगोजे व भागवत कांबळे यांनी सरकारवर कडाडून टीका केली.