परभणी - परभणी - गंगाखेड रोडवरील पोखणी नृसिंह फाटा येथे भारतीय जनता पार्टीने ओबीसी घटकांना स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज गुरुवरी (दि.१९) रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भागवत बाजगीर, युवा मोर्चाचे सुरेश भुमरे, बाबा पठाण, शिवाजी मोहाळे, दत्तराव साबळे, माधवराव चव्हाण, नरहारी एडके,रायभान भुबरे, आश्रोबा लोखंडे, अंकुश तवर, सुरेश कच्छवे, दत्राव कच्छवे, दिपक बीडकर, नवनाथ वाघ, ज्ञानोबा वाघ, परसराम राहवे, गणेश लोखंडे,बंडु सोरेकर,,केशव कच्छवे, काशिनाथ कांबळे, अशोक पिसाळ,राजेभाऊ राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) आरक्षण लागू करण्यासाठी तिहेरी चाचणी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या आदेशाचे पालन ठाकरे सरकार करु न शकल्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी घटकांचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असून हा आघाडी सरकारने ओबीसी वर केलेला अन्याय आहे. याचा तिव्र निषेध आजच्या आंदोलनात भाजपने केला असुन, सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या अटी म्हणजे मागासवर्गीय आयोग स्थापन करुन ओबीसी समाजांचे मागासलेलेपण सिध्द करणे आणि ५० टक्केच्या मर्यादेत आरक्षण लागू करणे होय. हे निकष तात्काळ पुर्ण करुन स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना तात्काळ आरक्षण लागू करा या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टी ने जिल्ह्यात आंदोलन केले.आंदोलनस्थळी दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी भाजप पदाधिकारी यांना दैठणा पोलिस ठाण्यात अटक करुन सोडुन देण्यात आले.
Satyashodhak, obc