ओबीसी आरक्षणासाठी ओबीसी जातींची मंडळे, संस्था व वैयक्तीकरित्या निवेदन पाठवावे - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा

मागास प्रवर्गास आरक्षणासाठी समर्पित आयोगास ओबीसीतील सर्व जातींची मंडळे, संस्था व वैयक्तीकरित्या निवेदन पाठवावे - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा

     धुळे - मागास प्रवर्गास आरक्षणासाठी समर्पित आयोगास ओबीसीतील महाराष्ट्रातील सर्व जातींची मंडळे , संस्था व वैयक्तीकरित्या निवेदन पाठवावे असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदद्वारे केले. संबंधितांना सोयीचे व्हावे व आशय समजावा या हेतूने समर्पित आयोगाला द्यायच्या निवेदनाचा कच्चा मसुदा आमच्याकडे उपलब्ध आहे . आमची प्रमुख मागणी येणेप्रमाणे . १) जातनिहाय जनगणना होऊन त्यांच्या संख्येनुसारच स्थानिक स्वराज्य संस्थां , आमदार- खासदारकीसाठी राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे. २) ओबीसींचा बॅकलॉग भरून मिळावा .. 3 ) ओबीसींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह व १०० % शिष्यवृत्ती मिळावी . ४ ) महाज्योती महामंडळाकरीता १२०० कोटी मिळावे. ५ ) आदिवासी जिल्ह्यातील कमी केलेले आरक्षण पूर्ववत करा .. ६ ) निवेदने देण्यासाठी अत्यल्प वेळ दिला असून त्याचा योग्य प्रचार व प्रसारही केलेला नाही . सबब याबाबत सर्व माध्यमातून तळागाळापर्यंत प्रचार व्हावा व निरपेक्ष / पारदर्शकता असावी .. ७ ) नामसाधर्मता भासवलेल्या नांवाने समाविष्ठ जाती ओबीसीमधून वगळाव्यात . ८ ) निव्वळ निवेदने न मागवता तालुका / जिल्हास्तरावर सुनावणी घेण्यात यावी . वरील मागण्यांपैकी मूलभूत मागणी म्हणजे जातनिहाय जनगणना करणे व त्यासाठी राज्यशासनाच्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणांपैकी आंगणवाडी- आशा वर्कर , महसूलमधील तलाठी , शिक्षकवर्ग इ . जर या देशकार्यात लावले तर तीन महिन्यात ( ४५५ कोटी रुपयांचा बाऊ न करता ) जनगणना होऊ शकते .. तरी आपणांस या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की , वरील मागण्या व सूचनांचा न्यायाधिष्ठित विचार व्हावा हीच अपेक्षा .. !

For OBC reservation should send a statement Maharashtra Prantik Tailik Mahasabha    ओबीसीतील सर्व जातीतील लोकांनी व संस्था , मंडळे यांनी हे मुद्दे घेऊन स्वतःच्या भाषेत आपणांस योग्य वाटेल तसे निवेदन तयार करावे व दि . १० मे २०२२ पर्यंत पोहोचतील असे ठरलेल्या मुदतीत आयोगाला भेटून अथवा पोस्ट / कुरिअर द्वारे द्यावे / पाठवावे .. आपल्या माहितीकरीता इमेल पत्ता , व्हॉटसप नंबर तथा पत्ता सोबत देत आहे .. ! १ ) ईमेल आयडी- dcbccmh@gmail.com २ ) व्हॉटसप नंबर - ९१२२२४०६२२१२१ वरील ईमेल व व्हॉटसप नंबर अथवा खालील वडाळाच्या पत्यावर निवेदन पाठवावे .. ! पत्ता..येणेप्रमाणे .. 3 ) अध्यक्ष / सचिव , मागास प्रवर्गास आरक्षणासाठी समर्पित आयोग , ( महाराष्ट्र राज्य ) कक्ष क्रमांक ११५ , पहिला माळा , ए - १- इमारत , वडाळा टर्मिनल , वडाळा , आर.टी.ओ. जवळ , वडाळा , मुंबई - ४०००३७ असा असून निवेदनाखाली निवदेन देणाऱ्या संस्था , मंडळ यांनी किंवा व्यक्तीगत देणाऱ्यांनी आपले नाव , पत्ता , मोबाईल नंबर अवश्य द्यावा . असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष खा . राम ास तडस , कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे , प्रदेश महासचिव डॉ . भूषण कर्डिले , कोषाध्यक्ष गजानन शेलार , सेवा अध्यक्ष सुभाष पन्हाळे , समन्वयक सुनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा आघाडी राज्य महासचिव नरेंद्र चौधरी , मप्रातैमहासभा जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी ओबीसी आघाडीचे राज्य उपाध्यक्ष कैलास काळू चौधरी , मप्रातैमहासभा युवा आघाडी जिल्हाध्यक्ष व भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनेश बागुल , महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा विभाग कार्याध्यक्ष शशिकांत चौधरी , उपाध्यक्ष अनिल अहिरराव , वैद्यकीय आघाडी राज्य उपाध्यक्ष डॉ . भूषण चौधरी , युवा शहराध्यक्ष गणेश चौधरी , विभाग उपाध्यक्ष तुषार चौधरी , रमेश करनकाळ , दिलीप सुर्यवंशी , महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सौ . छायाताई करनकाळ , शहराध्यक्ष सौ . ज्योतीताई चौधरी , हिरु आप्पा चौधरी , किशोर थोरात , पोपटराव चौधरी , कल्पेश चौधरी , महेश चौधरी , राहूल अहिरराव , भगवान चौधरी , विलास आण्णा चौधरी , विनोद चौधरी , मनोज चौधरी , किरण बागुल , मनोहर चौधरी , किरण चौधरी , कल्पेश थोरात , पंकज चौधरी , राजू गणपत चौधरी , विजय नेरकर , विजय चौधरी , डॉ . गणेश चौधरी , प्रशांत बागुल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते .

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209