१४ एप्रिल रोजी जवाहर विद्यार्थी गृह संस्थेतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रज्ञासुर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संस्थेचे अध्यक्ष श्री.रमेश गिरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिव्हिल लाइन्स येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी अभिवादन करण्यासाठी पदाधिकारी व विश्वस्त गुलाब जुननकर, शंकरराव भुते, चंद्रकांत ढोबळे, मिलिंद माकडे, प्रदीप लाखे, शेखर बाळबुधे, शेषराव सावरकर, पंढरीनाथ ढोबळे, प्रमोद महाजन, बबीता मेहर, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.