नागपूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे शहराध्यक्ष पदावर मानेवाडा बालाजी नगर येथील धडाडीचे नेतृत्व राजेश रहाटे यांची शहराध्यक्ष पदावर डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिनांक 31.03.2022 च्या सभेमध्ये घोषणा केली. त्या घोषणेची पूर्तता त्यांना नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. राजेश रहाटे हे काँग्रेसचे तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यात आघाडीवर आहे त्यांचा चाहता मित्र परिवार मोठा वर्ग आहे. त्यांच्या नियुक्तीने नागपूर शहरांमध्ये ओबीसी महासंघाचे कार्य वाढेल अशी त्यांनी हमी दिली असून त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचे आभार व्यक्त केले असून त्यांच्या नियुक्तीचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय सचिव शरद वानखेडे, कोषाध्यक्ष गुणेश्वर आरिकर, जिल्हा अध्यक्ष राज चौधरी, जिल्हा महिला अध्यक्षा निशा खडसे, महिला शहराध्यक्षा वृंदाताई ठाकरे, महाराष्ट्र महिला महासंघाच्या अध्यक्षा कल्पना मानकर, मंगला देशमुख, नयना झाडे, संजय मांगे, घनश्याम मांगे, विदर्भाचे कार्याध्यक्ष शकील पटेल, विदर्भ महासचिव विजय पटले, विजय धोटे, अनंत भारसाकडे, इत्यादी असंख्य कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.