राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन कामठी तालुक्‍यात गादा येथे आयोजीत

स्वागताध्यक्ष राजेश काकडे यांची माहिती

     नागपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघ गेल्या ७ वर्षांपासून ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्यांसाठी संघर्ष करीत असून, ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी महासंघाचे नागपूर जिल्हा अधिवेशन १७ एप्रिलला कामठी तालुक्यातील गादा येथे होणार आहे, अशी माहिती अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राजेश काकडे, नागपूर जिल्हाध्यक्ष राजू चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

     अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी बहुजन कल्याण तथा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास ठाकरे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, आमदार परिणय फुके, आमदार अॅड. अभिजित वंजारी आदींची उपस्थिती राहणार आहेत. अधिवेशनाला ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेला महासंघाच्या उपाध्यक्षा सुषमा भड, वृंदा ठाकरे, अनिता ठेंगडी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Satyashodhak, obc, Mahatma phule, Periyar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209