महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आयोजन
भंडारा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भंडाराच्यावतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संघटनेच्या कार्यालयात पार पडला.
पारितोषिक वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मअंनिसचे जिल्हाध्यक्ष हर्षल मेश्राम हे होते. यावेळी अतिथी म्हणन सिहोरा जि.प सदस्य सुषमा पारधी, माजी नगरसेविका चंद्रकला भोपे, मुख्याध्यापक पद्माकर रहांगडाले उपस्थित होते. याप्रसंगी निबंध स्पर्धेतील विजेती स्पर्धक प्राची मरस्कोल्हे, नव्या गजभिये यांनी अंधश्रद्धा व महिला विषयावर भाषण दिले. जि.प.सदस्या सुषमा पारधी यांचा समितीच्यावतीने शाल देऊन कविता लोणारे, चंद्रकला भोपे यांनी सत्कार केला. सिहोरा परिसरातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सदैव तयार असल्याचे आश्वासन पारधी यांनी दिले. महिलामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाल्यास येणारी पिढी ही विज्ञानाला आत्मसात करणारी निपजेल. यासाठी महिलांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत पुढाकार घ्यावा, असे आवाहन हर्षल मेश्राम यांनी केले. यावेळी विजेत्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे यांनी केले. संचालन प्रा.नरेश आंबिलकर यांनी तर आभारप्रदर्शन चंद्रशेखर भिवगडे यांनी केले. कार्यक्रमाला प्रीतम चव्हाण, प्रा.युवराज खोब्रागडे, गणेश निमजे, किरण गडपाले, प्रतीक्षा पारधी, अलिशा गडपाले, साक्षी गाडेकर उपस्थित होते.