जळोची, दि. ६ - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रबोधनकारांच्या यादीतून थोर साहित्यिक, साहित्यरत्न, अण्णाभाऊ साठे यांचे नाव जाणीवपूर्वक वगळल्याने संतप्त समाज बांधवांनी एकत्रित येत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. बारामती शहरातील हुतात्मा चौकात विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.
केंद्राच्या अखत्यारितील डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनद्वारे देशभरातील थोर समाजसुधारक व महामानवांची यादी तयार केली जाते. या यादीतील अण्णाभाऊंचे समाविष्ट असलेले नाव वगळण्यात आले. या कृत्यामुळे मातंग समाज व अण्णाभाऊ अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्याने घटनेबद्दल निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी अण्णाभाऊंचे विचार रशियासारख्या बलाढ्य देशाने स्वीकारले आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अण्णाभाऊंचे नाव जाणीवपूर्वक वगळल्याबद्दल सुनील शिंदे, बिरजू मांढरे, साधू बल्लाळ, चंद्रकांत खंडाळे, सोमनाथ पाटोळे, विजय नेटके यांनी तीव्र प्रतिक्रिया घटनेचा निषेध व्यक्त केला.
निषेध आंदोलनात बारामती शहर व तालुक्यातील मातंग समाज बांधव, आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होता.
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan