पुणे - क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले जयंती निमित्ताने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सोमवार दि.०३/०१/२०२२ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहनदादा जोशी, दिप्तीताई चवधरी, पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद यांच्या हस्ते सावित्रीमाता फुले यांच्या प्रतिमेस काँग्रेस भवन येथे पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नगरसेविका लताताई राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, नगरसेवक रफिक शेख, अनिस खान, यासिन शेख, अस्लम मिरजकर, प्रशांत सुरसे, सुंदरताई ओव्हाळ, राजेंद्र भुतडा, राजश्रीताई अडसूळ, ज्योतीताई परदेशी, राधिका मखामले, कल्पना उनवणे, पौर्णिमा बहिरट, सिध्दीविनायक बामणे, मनोज पवार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan