परभणी - ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवार ३ जानेवारी रोजी ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते मंडळी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओबीसी आरक्षण धोक्यात आले असून केंद्र व राज्य सरकार या बाबत टोलवाटोलवी करत आहे. परिणामी आगामी काळात होणाऱ्या निवडणूकीत ओबीसी बांधवांना आरक्षणापासुन वंचित रहावे लागले आहे. येत्या काळात शैक्षणिक आरक्षणही धोक्यात येण्याची शक्यता आहे. वेळीच प्रतिकार करण्यासाठी आणि ओबीसी आरक्षण कायम ठेवणे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे, ओबीसी आरक्षण लागु होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलणे, मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागु करा आदी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खा. संजय जाधव, आ. सुरेश वरपूडकर, आ.डॉ. राहूल पाटील, आ.डॉ. रत्नाकर गुट्टे, आ. बाबाजानी दुर्राणी, माजी आ. अॅड. विजय गव्हाणे, उप महापौर भगवान याघमारे, माजी महापौर प्रताप देशमुख, अॅड. स्वराजसिंह परिहार, कॉ. किर्तीकुमार बुरांडे, प्रा. तुकाराम साठे, प्रा. किरण सोनटक्के, बाळासाहेब रेंगे पाटील, गंगाप्रसाद आणेराव, विशाल बुधवंत, नानासाहेब राऊत, रामप्रभु मुंडे, दत्ता मायंदळे, एन. आय. काळे, सुभाष जावळे, माजी आ. रामराव वडकुते, हरिभाऊ शेळके, प्रभूअप्पा वाघीकर, डॉ. धर्मराज चव्हाण, कैलास माने, सुर्यकांत हाके, विश्वनाथ थोरे, डॉ. मदन लांडगे, माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, विष्णु कुटे, बबन आण्णा मुळे, बंडू मेहत्रे, सचिन अंबिलवादे, प्रल्हाद मुरकुटे, प्रा. काशिनाथ सालमोटे, प्रल्हाद देवडे, मन्मय देशमाने, भागवत बाजगीर, अनंत बनसोडे, प्रभू जैस्वाल, मुंजाभाऊ गायकवाड, चक्रधर उगले, प्रसाद बुधवंत, चंदु शिंदे, अनिल गोरे, गोपीनाथ राठोड, राजेंद्र वडकर, कृष्णा कटारे, डॉ. सुनिल जाधव, फारुख बाबा, मुंजाजी गोरे, दत्ता नागरे, राजेश बालटकर, सुभाष पांचाळ, अॅड. संदिप आळनुरे, प्रसाद गोरे, गुलाब हरकळ, प्रा. अमोल गौतम, संपत सवणे, पांडुरंग भंवर, बबलु टाक आदीसह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.