परभणी : ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले असुन ते वाचवण्यासाठी तातडीने जन आंदोलन उभा करण्याचा निर्धार ओबीसींच्या बैठकीत करण्यात आला आहे. देशातील ओबीसींचे राजकीय अरक्षण आता धोक्यात आले असुन केंद्री व राज्य सरकार एकमेकांवर कुरघोडी करत यावर राजकारण करत आहेत परंतु नुकत्यात झालेल्या स्थानीक स्वराज्य निवडणुकीत एकट्या नगरपंचायत मध्ये ओबीसींना चारशे पासष्ट जागांना मुकावे लागले आहे.यवढेच नाही तर आज राजकीय आरक्षण गेले म्हणून गप्प बसलोत तर उद्या शैक्षणिक आरक्षणाला देखील हात घातला जाईल असी भिती ओबीसी वर्गामध्ये निर्माण झाली आहे. यावर चर्चा करुन अंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी परभणी जिल्ह्यातील ओबीसी बांधवांची आज परभणी शहरातील सखा गार्डन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत बर्याच प्रतीनिधींनी निर्माण झालेल्या परिस्थितीती बद्दल तिवृ भावना व्यक्त केल्या असुन येत्या काळात सर्व घटकांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभा करण्याचा निर्धार केला आहे या बैठकीला आयोजक भगवानराव वाघमारे, डॉ. धर्मराज चव्हाण, डॉ. सौराजसिंह परीहार, कॉ. किर्तीकुमार बुरांडे प्रा. तुकाराम साठे, विशाल बुधवंत, बबन मुळे यांच्या सह जेष्ट नेते हरीभाऊ शेळके मा. आ. रामराव वडकुते, गंगाप्रसाद अनेराव, प्रा. किरण सोनटक्के, विष्णु कुटे, प्रभु जैस्वाल, सचिन अंबीलवादे, प्रा. काशिनाथ सालमोटे, सुर्यकांत हाके, विश्वनाथ थोरे, प्रल्हाद देवडे, मुंजाभाऊ गायकवाड, गोपीनाथ राठोड, राजेंद्र वडकर, कृष्णा कटारे, अनंत बनसोडे, डॉ.सुनिल जाधव, मुंजाजी गोरे, प्रसाद गोरे, उस्मान भाई बेलदार, राजेश बालटकर, सुभाष पांचाळ, गुलाब हरकळ, प्रा. अमोल गोतम, संपत सवने, सुमीत परीहार, कुंडलीक सोगे, निवृत्ती गोरे, देवीदास शिंपले ,विष्णु सायंगुंडे, यांच्यासह शेकडो बांधवांची उपस्थिती होती.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan