नागपूर : संत म्हणजे सत्य सांगणारे सत्याचा विचाराने जगणारे. संत गाडगेबाबां अशीक्षीत असूनही बहुजन समाजाची प्रगती कशामुळे थांबते याचा त्यांना चांगला अभ्यास होता. शीक्षण जसे गरजेचे आहे तसेच अंधश्रद्धा आणि श्रध्दे मधला फरक स्माजून घेणे गरजेचे आहे. आज शीकलेली माणस अंधश्रध्देच समर्थन करतांना दीसतात तेव्हा वाईट वाटत. संत गाडगेबाबा अंधश्रद्धा नीमूलनाच विद्यापीठच होते. त्यांचा किर्तनातील लोकसंवाद मानवी मनांना विचार करायला भाग पाडायचे. असे विचार गाडगे बाबांच्या जीवनातील प्रसंगातून मांडत विद्यार्थी मनांना जागृत करनार प्रबोधन संत साहित्याचे गाडे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केले. राष्टीय विद्यालय मांडळ जि. नागपूर येथे गाडगेबाबांच्या पुण्यस्मृती निमीत्त बोलत होते. याप्रसंगी थोर समाज सेवक उद्योगपती रत्नाकर ठवकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे होते. प्रास्तावीक प्रकाश गोंडे यांनी केले. संचालन प्रा. सुरेश नखाते यांनी केले. संत गाडगेबाबांच्या विचार कार्याचा संकल्प घेत त्यांच्या स्मृतीना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थी शीक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थीती होती.