हदगाव - नांदेड जिल्ह्यातील हदगाव. येथे दि. २५ डिसेंबर २०२१ शनिवार रोजी एक दिवसीय सहावे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हदगाव येथील नगरपालिकेच्या गुरु रविदास सांस्कृतिक सभागृहात हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे, यानिमित्त साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. २४ डिसेंबर २०२१ शुक्रवारी स्थानिक साहित्यिक, लेखक व सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया यांच्या प्रतिनिधींच्या सत्कार सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले असून दुसऱ्या दिवशी
दि. २५ डिसेंबर २०२१ रोजी संत रविदास नगर हदगाव येथून गुरु रविदास, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,व मान्यवर कांशीराम साहेबांच्या प्रतिमेची आणि ग्रंथांची भव्य मिरवणूक सकाळी आठ वाजता हदगाव शहरातून काढण्यात येणार आहे. सदरील मिरवणुकीचे विसर्जन गुरु रविदास सांस्कृतिक सभागृहात होऊन सकाळी ठिक १० वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यांनंतर विविध पुरस्कारांचे वितरण आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा होईल.
दुपारी बारा वाजता होणाऱ्या परिसंवादात अनेक मान्यवर लेखक, कवी, विचारवंत आपले विचार व्यक्त करतील. सायंकाळी ४ वाजता अध्यक्षीय समारोप होईल आणि शेवटी स्वरुचीभोज होऊन कवी संमेलनाने एक दिवसीय साहित्य संमेलनाची सांगता होईल.
तरी शहर आणि तालुक्यातील साहित्य रसिक व सर्व समाज बंधू - भगिनी यांनी हदगाव येथे आयोजित या भव्य गुरु रविदास साहित्य संमेलनातील साहित्य रूपी मेजवानी चा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan