पाटण - भारतीय संविधानाचा दिवस म्हणजे भारतीय स्त्रियांच्या मुक्तीचा जाहीरनामाच आहे. धर्माने स्त्रियांवर अनेक प्रकारची बंधने घातली होती. शिक्षणावर संचार करण्यावर, बोलण्यावर बंदी होती. समाजाच्या बंदीवासातून संविधानाने महिलांना मुक्त केले असून संविधान भारतीय स्त्रियांच्या मुक्तीचा जाहिरनामा असल्याचे तसेच भारतीय स्त्रियांनी संविधान समजून घ्यावे. असे सौ. सुनीता लोहार यांनी सांगीतले.
सातारा शहर व तालुका ओबीसी महिला संघटनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सौ. कामिनी पाटील यांनी भारतीय स्त्रियांना नोकरी करण्याचे, समान वेतनाचे, मतदान करण्याचे. राजकारणात प्रतिनिधीत्व करण्याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले. म्हणून स्त्रिया आज सर्व क्षेत्रात चमकत असल्याचे सांगितले. सौ. लक्ष्मी कुंभार, दीपाली लोहार, रोहिणी राक्षे यांनी मनोगते व्यक्त केली. दीपाली लोहार यांनी आभार मानले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan