ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल सुरु आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे, असा आरोप फडणवीस वारंवार करत आहेत. पण देवेंद्र फडणवीस खोटे बोलत असून महाराष्ट्राची आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करीत आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण फडणवीस यांनीच घालवले.असा दावा जेष्ठ विचारवंत प्रा हरी नरके यांनी केला आहे. फडणवीस यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात वेळ आणि संधी असताना न्यायालयाने दिलेल्या मुदतीत ओबीसींच्या अहवालातील चुका आणि त्रुटी दुरुस्त केल्या नाहीत. हे त्यांनी मुद्दाम आणि जाणीवपूर्वक केले.त्यांना ओबीसीचे राजकीयच नाही तर सामाजिक आरक्षण सुद्धा खपते.म्हणूनच त्यांनी अहवालातील चुका सुधारित केल्या नाहीत. अहवालात दिड कोटी चुका होत्या.मात्र त्यातल्या ७० लाखाहून अधिक महाराष्ट्रातीलच होत्या. त्या फडणवीसांनी दुरुस्त का केल्या नाहीत ? हे फडणवीसांनी सांगावे असे प्रा हरी नरके म्हणाले आहेत.फडणवीस या सरकारने थेट अधिसूचना काढावी केंद्राचा डेटा मागूनये असे का म्हणतात ? फडणवीसांनी स्वतः १/८/२०१९ ला केंद्राकडे डाटा का मागितला होता ? याचे उत्तर त्यांनी द्यावे असे नरके म्हणाले आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी त्यावेळी पत्र पाठवले होते की चुका दुरुस्ती करून माहिती पाठवा. न्यायालयाने आठ आठवड्याचीमुदत दिली. तरीही फडणवीस सरकारने दरुस्ती अहवाल पाठवला नाही. न्यायालयाला माहिती वेळेत दिली गेली नाही म्हणून ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. हे पाप फडणवीसांचे आहे असा आरोप नरके यांनी केला आहे. जी माहिती २०१६ मध्ये मोदी सरकारने बैन केली तिची पावती तुम्ही महाविकास आघाडी सरकारवर का फाडता ? संघ आणि भाजपला कोणतेच सामाजिक आरक्षण, मान्य नाही हाच अजेंडा ते चालवत आहेत. मुडदे ते पाडत आहेत आणि रक्त मात्र दुसऱ्यावर शिंपडत आहेत असे नरके म्हणाले. माझे फडणवीसांना आवाहन आहे की महाराष्ट्राच्या जनतेला सत्य कळाले पाहिजे. त्यासाठी जाहीर आणि खुल्या चर्चेची माझी तयारी आहे असे नरके म्हणाले आहेत. ३ महिन्यात डेटा जमवता येतो असे म्हणता तर तुमच्या सत्ता काळात ६० महिने तुम्ही काय केले ? ते सांगा. फडणविसपंत, हे प्रश्न मी जाहीरपणे समाज माध्यमे व वाहिन्यांवरून तुम्हालाच विचारलेत, त्याची जाहीर उत्तरे द्या, पळ काढू नका. आरक्षण मुक्त भारताचे तुम्ही पाईक असताना बहुजनांचा बुद्धीभेद नी शब्दच्छल करण्याचा पिढीजात उद्योग का करताय ? हिम्मत असेल तर आमने सामने चर्चा करा.माझे आपणास या द्वारे ओपन चैलेंज आहे. आपली सत्याला सामोरे जाण्याची हिम्मत आहे का? असा सवाल प्रा.हरी नरके यांनी केला आहे. फडणवीस यांनी मात्र नरके विचारवंतापेक्षा महाविकास आघाडीचे प्रवक्ते म्हणून बोलत असल्याचा पलटवार केला आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan