सोलापूर - अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने क्रांतीसुर्य समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 131 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम सुपरमार्केट सोलापूर येथे अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष योगेश माळी यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन संपन्न झाला. यावेळी बोलताना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गुणगौरव केला तसेच त्यांचे कार्य समाज बांधवांना अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी त्यांनी सोलापूर शहरातील जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची व सुशोभिकरणाची मागणी सोलापूरच्या महापौर श्रीकांचनाताई यल्लम यांच्याकडे केली. त्याच बरोबर शासनाकडे जातनिहाय जनगणना करण्याची मागणी यावेळी केली.
या कार्यक्रमाला अगंद माळी, भाऊसाहेब झगडे, धन्यकुमार डोके, संजय राऊत, सुरेश गोरे, गणेश माळी, मारुती तोडकर, भागवत शिंदे, परमेश्वर ननवरे,शरद ननावरे, अनिल राऊत,भाऊसाहेब गवळी, नवनाथ नेवसे, मोहन माळी, अशोक माळी, सुरेश शिंदे, नाळे,खारे इत्यादी मान्यवरांसह फुले प्रेमी अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan