महामानव फौंडेशन आयोजित "संविधान जागर सप्ताह" दाढ येथे दि. १९/११/२०२१ शनिवार रोजी प्रथम दिनी भरविण्यात आला. भारतीय संविधान व त्याचे नागरिकांप्रती मुलभूत हक्क अधिकार , कर्तव्य याविषयी यानिमित्ताने प्रबोधन ठेवण्यात आले होते. भारतीय नागरिकांना देश चालविण्याचे व्यवस्थेचे निश्चित ज्ञान मिळावे म्हणजे ते ही या व्यवस्थेत आपली हिस्सेदारी करु शकतात. यासाठी महामानव फौंडेशनचे वतीने संविधान जागर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब पाळंदे यांनी सांगितले की, "संविधान वाचन नसल्यामुळे नागरिक संविधानिक मूल्यांच्या मुलभूत अधिकारापासून वंचित राहतात. यासाठी संविधान वाचन व मनन करणे हे नागरिकांच्या हितावह राहिल." काॅ. कानिफ तांबे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, "संविधान हे स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या तत्वाने तयार झालेय. स्वातंत्र्य नसेल तर समता व न्याय मिळणार नाही त्यामुळे बंधुताही राहणार नाही. यासाठी संविधान वाचणे व समजून घेणे समाजहितावह राहिल". फौंडेशनचे अध्यक्ष शिमोन जगताप यांनी सांगितले की, "भारतीय संविधान हा देशातील ७५०० जातींना एकसूत्र, एकनियम व एक बंधुभाव यात बांधून ठेवण्यासाठी कामी येते.. स्वातंत्र्यानंतर अनेक जातीधर्म यांना एक देश व एक विधान या तत्वावर बंधुभाव निर्माण करणारा जागतिक ग्रंथ म्हणजे संविधान होय.."
महाराष्ट्र टाईम्स वृत्तवाहिनीचे पत्रकार सचिन बनसोडे यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक नागरीकाला धर्म, विचार, भाषण, शिक्षण, नौकरी, लेखण याचे स्वातंत्र्य बहाल केलेय.. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी संविधानिक न्याय मागता येतो.. यासाठी नागरिकांनी जागरुक राहिले पाहिजे... यामुळे संविधानिक न्याय-हक्काचे वातावरण तयार होऊन "एक देश भावना" वाढीस लागेल". बाजीराव बनसोडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "संविधान हे संत व महापुरुष यांच्या सामाजिक संघर्षातून निघालेल्या फलश्रुतीचे श्रेय होय. 'संविधान निरक्षरता' हयामुळे देशातील संविधानिक लोकशाही ला भ्रष्टाचार, जातीयवाद, विषमता,दंगली याची कीड लागलीय.. यामुळे संविधानाला धोका होत चाललेला आहे. संविधानाचे ४ आधारस्तंभ विधायिका, कार्यपालिका, न्याय, मिडिया होय. यातील प्रतिनिधी भारतीय संविधानाचा प्रचार-प्रसार अजिबात करत नाही. त्याप्रकारची माहितीही लोकांना देत नाही.. संविधानिक हक्क-अधिकाराची हवाही लोकांना लागू देत नाही. यामुळे जनता संविधान निरक्षर राहिली. त्याचा परिणाम जनतेला ज्या संविधानावर देश चालतो त्याविषयी आवड, निकड, आत्मियता अजिबात राहिली नाही.. त्यामुळे संविधान निरक्षर लोक देश चालविण्याच्या सर्व हिस्सेदारीतून बाहेर फेकली गेली. यामुळे आता संविधान साक्षर होणे हेच देशहितावह राहिल. देशात संविधान साक्षर लोक व जाती हया देशाचे नेतृत्व करतात. त्यामुळे आता संविधान निरक्षरता हयामुळे देशाचे फार मोठे नुकसान होणार आहे. यासाठी संविधान वाचन व मनन च समाजांना वाचवेल...आज देशात संविधान साक्षर लोक हे देशातील लोकांनाच संविधान समजून सांगत नाही, संविधान साक्षरतेऐवजी धार्मिक साक्षरता मोहिम काही लोक चालवतात यामुळे लोक भक्ती व भ्रम यात अडकत जाऊन संविधान निरक्षर बनत आहे.. संविधान निरक्षरता ही देशात अराजकता निर्माण करेल. यासाठी संविधान आजच वाचा व आपले संविधानिक अधिकार वाचवून देश वाचवा." या कार्यक्रम प्रसंगी दाढ नागरिक उपस्थित होते. अनिल सोमवंशी, राजू जगताप,दाढ ग्रामस्थ, उपस्थित होते...अध्यक्षस्थानी साहेबराव गाडेकर होते..
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan