ठाणे - राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सिंहावलोकन शिबिर ठाणे येथील ग्रँड सत्कार एक्झिक्युटिव्ह हॉटेल मध्ये मंगळवार दि.23.नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री बबनराव तायवाडे सर तसेच महासचिव मा.सचिन राजूरकर सर, सहसचिव मा.शरद वानखेडे सर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. प्रकाश भांगरथ, तसेच सर्व विभागाचे अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष, व इतर पदाधिकारी, तसेच ओबीसी अधिकारी-कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री श्याम लेंडे सर , सरचिटणीस श्री अनिल नाचपल्ले सर तसेच सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस विभागीय अध्यक्ष व पदाधिकारी तसेच महिला महासंघाचे अध्यक्ष *माननीय कल्पनाताई मानकर तसेच सर्व जिल्ह्यांच्या महिला अध्यक्ष ,सरचिटणीस व विभागीय पदाधिकारी तसेच युवा महासंघाचे अध्यक्ष सरचिटणीस विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासचिव श्री सचिन राजूरकर सर यांनी केले. महासंघाचे गेल्या दोन वर्षातील कार्य, कोरोना काळातील कार्य,राष्ट्रीय अधिवेशनातील ठराव ,आणि भविष्यातील राष्ट्रीय महासंघाची भूमिका आणि आजच्या सिंहवलोकन कार्यक्रम चा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर ऋषभ राऊत प्रवक्ता राष्ट्रीय ओबीसी महासंघ नागपूर यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची चळवळ आता झपाट्याने वेग घेत असून महासंघाला खूप चांगले दिवस तेव्हा येतील जेव्हा सर्व ओबीसी समाज एकत्र येऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून शासनाकडे मागण्या मागण्यासाठी पुढाकार घेईल. त्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मा. श्री बबनराव तायवाडे सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
जो ओबीसी की बात करेंगा वही देश पे राज करेंगा
ही घोषणा देऊन आपल्या मनोगताला सुरुवात केली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या स्थापनेपासून आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली. 11 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाची स्थापना करण्यात येणार असून नागपूर येथे त्यांचे अधिवेशन असून किमान पाचशे वकील त्या अधिवेशनात सहभागी होणार असल्याचे सांगितले. तसेच राष्ट्रीय महासंघाचे वार्षिक अधिवेशन 7 ऑगस्ट या तारखेस कायमस्वरूपी असून त्याच तारखेला दर वर्षी अधिवेशन घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच सर्व विभागाच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना सर्वांनी महिन्यात किमान एक वेळा तरी एकत्र यावे आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, SDO, पोलीस कमिशनर ,जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या भेटी घेऊन आपल्या स्तरावरील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता देण्याची मागणी करावी. राज्यस्तरावरील व राष्ट्रीय स्तरावरील मागण्याचे निवेदन द्यावे असेही त्यांनी सांगितले. तसेच ओबीसी समाजासाठी घरकुल योजना मंजूर करावी, अशाही मागण्या करण्याचे सांगितले.
सर्वांनी एकमेकांमध्ये समन्वय व संवाद ठेवावा काही अडचणी असल्यास किंवा प्रश्न असल्यास फोन करून मला प्रश्न सांगावेत, तसेच विभागीय अध्यक्षांनी विभागात दौरे करून विभागीय कार्यकरिणी बनवाव्यात व विभागीय अधिवेशन घेण्यात यावे. असेही सांगितले. तसेच सर्व जिल्ह्याच्या जिल्हा, तालुका, शहर ,गाव इत्यादी पातळीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शाखा निर्माण कराव्यात असेही त्यांनी सांगितले .तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे कोणकोणत्या मागण्या राज्य शासनाकडे व महाराष्ट्र शासनाकडे करण्यात येत आहेत त्याची माहिती माननीय तायवाडे सर यांनी दिली. ओबीसी समाजासाठी बहुजन कल्याण विभागामार्फत महाज्योती अंतर्गत अकरा उपक्रम सुरू करण्यात आले असून त्या उपक्रमाचा लाभ ओबीसी समाजातील जास्तीत जास्त जणांनी घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले.
दुपारी स्वादिष्ट जेवणाच्या नंतर मध्यंतरानंतर सर्व विभागाच्या विभागीय अध्यक्ष आणि तसेच इतर विंगच्या अध्यक्षांनी आपापल्या कार्याचा आढावा दिला. त्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे माननीय श्री श्याम लेडे सर तसेच महिला महासंघाच्या माननीय श्रीमती कल्पनाताई मानकर तसेच युवक महासंघ आणि सर्व विभागाच्या अध्यक्षांनी आपापल्या विभागातील कार्याचा आढावा दिला. याच प्रसंगी वर्ग एक महिला अधिकारी शिखा व महिला पत्रकार दिव्या भगत यांचा सत्कारही करण्यात आला. या आढावा बैठकीसाठी राज्यभरातून जवळपास 200ते 250 पदाधिकारी उपस्थित होते.तसेच जवळच्याच गुजरात राज्यातून ही अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी काही नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीही देण्यात आल्या. शेवटी सर्वांचे आभार व्यक्त करून आढावा सिंहवलोकन बैठक संपन्न झाली..