शहिद शेतकऱ्यांची अस्थिकलश यात्रा पुण्यात - सर्वा तर्फे शहिद शेतकऱ्यांना श्रद्धांजली
पुणे - वाल्हे, : केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी आणि कामगार कायद्यांमध्ये बदल केलेले असल्याने त्याचे दूरगामी परिणाम आता दिसू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेत सोडून रस्त्यावर उतरावे लागत आहे. अशाप्रकारे केंद्राच्या या शेतकरीविरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर गाडी घालून त्यांना मारणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याची जळजळीत टीका किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अॅड. फत्तेसिंग पवार यांनी केली.
वाल्हे ( पुणे , ता. पुरंदर) येथे आज उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे झालेल्या आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या आठ शेतकऱ्यांची अस्थिकलश यात्रा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वाल्हे व मांडकी येथे आली होती. वाल्ह्याचे सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते
अस्थिकलश यात्रेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी बाळासाहेब भुजबळ,दीपक कुमठेकर, रणसिंग पवार, प्रा. संतोष नवले, छाया भुजबळ, कुंडलिक पवार, बाळासाहेब जगताप, सुहास खवले, सूर्यकांत भुजबळ, नारायण पवार उपस्थित होते. मांडकी येथे सोमेश्वर'चे संचालक विश्वास जगताप व माजी संचालक मोहन जगताप यांनी कलश रथयात्रेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या वेळी येथील शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत दुचार्क व ट्रॅक्टरची तालुक्यातून रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचे चंद्रकांत पिलाणे यांनी सांगितले.
या वेळी नामदेव गावडे, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, बाळासाहेब राऊत, रणसिंग पवार, राजेंद्र गायकवाड, माणिक पवार आदी उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan