वडूज : मुस्लिम ओबीसी समाजाच्या न्याय व हकासाठी ऑल इंडिया मुस्लिम बॅकवर्ड क्लासेस संघटना कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रशिद बागवान यांनी केले.
वडूज येथे ऑल इंडिया मुस्लिम बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय मुस्लिम समाजाचा मेळावा व नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जरार अहमद बागवान, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अब्दुल सुतार, मुल्ला मस्जिद ट्रस्टचे कुटुंब प्रमुख व सचिव एन. ए. मुल्ला, मुस्लिम सेवा संघाच्या जिल्हाध्यक्ष दिलशाद तांबोळी, अॅड. रफिक शेख, गुलाब शेख, मोहंमद खान झारी, उपाध्यक्ष व मानव हक्क संघटना तालुकाध्यक्ष शबाना मुल्ला, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, भरत लोकरे, राजू मुलाणी, डॉ. प्रशांत गोडसे, मुन्ना मल्ला, दिलावर शिकलगार, कय्यूम मुल्ला, बंटी मुल्ला, इब्राहिम मणेर, झहीद काझी, सिकंदर आत्तार, अमानतुल्ला मुल्ला, रमजान आत्तार, आश्पाक शेख, युसूफ आत्तार, शफीक मुल्ला, लियाकत बागवान, आयूब मुल्ला, सादिक मुल्ला, अझर मुल्ला, मन्सूर मुल्ला, खुदबुद्दीन शेख, नूरमहमद मल्ला, सद्दाम मुल्ला, दस्तगीर आत्तार, आलताब मुल्ला, इरफान मुल्ला, इंजमाम मुल्ला व समाज बांधव उपस्थित होते.
बागवान म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून ओबीसी द्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, मुस्लिम ओ.बी.सी. समाजावरील अन्याय दुर करावा. यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ओबीसी मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजानेही संघटनेच्या पाठीशी रहावे.
जाफरअल्ली आत्तार म्हणाले, ओबीसी मुस्लिम समाजबांधवांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन कटिबद्ध आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजबांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहु, खटाव तालुक्यात संघटना वाढीसाठी आगामी काळात प्रयत्न केले जातील. प्रारंभी मौलाना तौसीफ रजा यांनी धार्मिक माहिती दिली. भरत लोकरे, डॉ. प्रशांत गोडसे, अॅड. रफीक शेख, दिलशाद तांबोळी यांची भाषणे झाली. संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी जाफरअल्ली आत्तार यांची नियुक्ती करण्यात आली. गुणवंत विद्यार्थी कशनूर शेख व इक्रा आत्तार यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी मुल्ला मस्जिद अहले सुन्नत वल जमाअत, ख्वाजा गरीब नवाज यंग ग्रुप, केजीएन ग्रुप, रजा ग्रुप, हजरत सिद्धीलाल शाह बाबा उर्स कमेटीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. मुल्ला मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद मुल्ला यांनी प्रास्ताविक केले. रियाज मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. शहानवाझ आत्तार यांनी आभार मानले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan