खटाव तालुका मुस्लिम ओबीसी संघटनेच्या वतीने उद्या ( 14 नोव्हेंबर रविवारी ) सकाळी दहा वाजता वडूज येथील अक्षता मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष जाफरअली आतार यांनी दिली. मेळाव्यास राज्याचे उपाध्यक्ष जरार अहमद बागवान, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अब्दल सुतार, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शाफिक शेख, संघटनेचे जिल्हाध्यक्ष रशीद बागवान, पिरमहम्मद इनामदार, गुलाब शेख, अॅड. रफिक शेख, मोहम्मद खान झारी आदी उपस्थित राहणार आहेत. या वेळी मुस्लिम ओबीसी व अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक प्रश्नासंदर्भातील शासकीय निर्णय, जातपडताळणी समितीतील दिरंगाई, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज आदी विषयावर चर्चा होणार आहे. खटाव तालुक्यातील नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात येणार असून, तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आतार यांनी केले आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar