११ वी सायन्स च्या ओबीसी विद्यार्थ्यांनी जेईई व नीट साठी महाज्योती वर मोफत नोंदणी करा : राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांचे आवाहन

     इयत्ता ११ वी सायन्स मध्ये शिकत असलेल्या ओबीसी, व्हीजे एनटी व एस. बी. सी. प्रवर्गातील विद्यार्थी - विद्यार्थिनीं नी महाराष्ट्र शासना च्या महाज्योती पोर्टल वर आपली नोंदणी करावी व जेईई, नीट व सीईटी २०२३ साठी मोफत प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी जळगांव जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. महा विकास आघाडी शासनाच्या महाज्योती पोर्टल वर सन २०२१-२२ मध्ये ११वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी, व्हीजे एन. टी. व एस. बी. सी. प्रवर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनीं साठी ही योजना आहे.

MahaJyoti for other backward class    ओबीसी समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना भरपूर फी भरुन जेईई, सीईटी व नीट परीक्षेसाठी खाजगी क्लास लावता येत नाहीत, म्हणून महाविकास आघाडी शासनाने ही योजना सुरू केलेली असून यात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रतीचा टॅब व दररोज ६ जीबी इंटरनेट डाटा मोफत मिळणार आहे.

    महाज्योती तर्फे १४ नोव्हेंबर पासून जेईई, नीट व सीईटी साठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी www.mahajyoti.org.in ह्या वेबसाईट वर १५ नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करायची आहे. त्यानंतर नोंद केलेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब व ६ जीबी इंटरनेट डाटा ऑनलाइन क्लास साठी मिळणार आहे.

    सदर योजनेचा फायदा यंदा ११ वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे, ह्या वर्षी १२ वी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही. तरी महाविकास आघाडी शासनाच्या विद्यार्थी उपयोगी योजनेचा ओबीसी, व्हीजे एन टी व एस बी सी प्रवर्गातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे

   आवाहन राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केले आहे.

 

Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209