तीर्थपरी : महाराष्टातील ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी दुग्ध विकासमंत्री तथा रासपा चे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. तीर्थपुरी येथे एका सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की ओबीसींची जनगणना व ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपण कायम प्रयत्नशील असून श्री संत सावता महाराजांचे आरणगाव,अहिल्यादेवींचे चौंडी या ठिकाणी आपण नेहमी भेटी देऊन त्या गावच्या विकासासाठी निधी दिला आहे. त्याच प्रमाणे ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी आपण प्रयत्नशील असून त्यासाठी सर्व पक्षांनी समर्थन देणे गरजेचे आहे. जालन्यामध्ये ओबीसींचा नुकताच विराट मोर्चा झाला, हा मोर्चा परिणामकारक असून असे मोर्च महाराष्ट्रभर निघाले तर केंद्र व राज्य सरकारवर त्याचा निश्चितच परिणाम होईल व जातनिहाय जनगणना करण्याचा सरकार निश्चितच विचार करेल. यावेळी बोलताना त्यांनी जालन्यात झालेल्या मोर्चाचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी ओमप्रकाश चितळकर अशोक लांडे नाथ इंडस्ट्रीजचे चेअरमन गणेश बोबडे, उद्धव लांडे, सुदाम मापारे, मंगेश वाघमारे, श्रीकांत मुंबे आदींची उपस्थीती होती.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan