मंगल परिणय सोहळ्यानिमित्त संविधान प्रस्ताविका वाचन, पुस्तक प्रकाशन स्टाॅल उद्घाटन...
पारशिवनी तालुक्यातील कोलितमारा येथील रहिवासी रामदास सोमकुवर यांच्या मुलीचा मंगल परिणय सोहळा अमन सभागृह पारशिवनी येथे दि.७ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी रामटेक विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार आशिषबाबू जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते. मंगल परिणय सोहळ्याच्या निमित्ताने रामदासजी सोमकुवर यांचे स्वलिखित पुस्तक जंगल झाडीमुळे माणसाचे परिवर्तन आणि माझा जंगल खजिनां पेंच या दोन पुस्तकाचे प्रकाशन व पुस्तक स्टाॅलचे उत्घाटन आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. याच दिवशी प.पु. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस असल्याने संविधान प्रस्ताविकेचे वाचन डॉ.इरफान अहमद यांचे द्वारे वधू-वर, उपस्थित प्रमुख अतिथी व निमंत्रित सर्व पाहुणेमंडळींनी केले. याप्रसंगी आमदार आशिष जयस्वाल म्हणाले की, असा आगळावेगळा मंगल परिणय सोहळा पारशिवनी तालुक्यात पहिल्यांदाच होत आहे की, ज्यामध्ये वधूवरांना भेट स्वरूपात पुस्तके, महापुरुषांचे विचार,बोधिवृक्ष देण्यात येत आहे. रामदासजी जंगलझाडीतील दुसरे मारुती चितमपल्ली आहे,असे मत व्यक्त केले.
मंगल परिणय सोहळ्यात ज्ञानेश्वरदादा रक्षक, अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता व प्रतिमा वधूवरांना भेट देऊन शुभाशिर्वाद दिला. याप्रसंगी विलास गजभिये स्तंभलेखक अध्यक्ष परिवर्तन विचारमंच यांनी रामदासजींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रा.भीमरावजी गायकवाड ज्येष्ठ आंबेडकरी कवी, साहित्यिक आणि संदिप शेंडे कवी लेखक, प्रा.श्रीधर सोमकुवर, कमलाकरजी डोंगरे माजी सहाय्यक वनसंरक्षक इ. बरेचसे मान्यवर उपस्थित होते. सरतेशेवटी रामदासजी सोमकुवर यांनी उपस्थित सर्व प्रमुख अतिथी तसेच आमंत्रित निमंत्रित मंडळींचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. खऱ्या अर्थाने या मंगल परिणय सोहळ्याच्या निमित्ताने समाजाला वैचारिक प्रेरणा संदेश मिळालेला आहे. यावेळी सर्व आमंत्रित निमंत्रित पाहुणे मंडळींनी आगळ्यावेगळ्या मंगल परिणय सोहळ्यानिमित्त वधूवरांना मंगलकामना दिल्या.