ओबीसी विद्यार्थ्यांना मिळाले 'टॅब'

महाज्योतीचा उपक्रम : दररोज सहाजीबी इंटरनेट डेटाही मोफत

     वर्धा : महाज्योतीकडे नोंदणी केलेल्या ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन सुरु असलेल्या या प्रशिक्षणाकरिता नोंदणीकृत विद्यार्थ्यांना राज्यभरात मोफत टॅब वितरित केले जात आहेत. वर्धा जिल्ह्यातील १२६ ओबीसी विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप करण्यात आले असून, दररोज सहा जीबी इंटरनेट डाटाही मोफत मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

MahaJyoti gives Tab to obc students     यशवंत महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये महाज्योतीचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.दिवाकर गमे यांच्या हस्ते टॅबचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख, समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, नीळकंठ पिसे, विनय डहाके व नीळकंठ राऊत उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. ही संस्था ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागासवर्ग यामधील विद्यार्थी व समाजाच्या विकासासाठी कार्य करीत असते. त्याचाच एक भाग महाज्योतीने ओबीसी भटके विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी जेईई नीट व सीईटी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मोफत प्रशिक्षण सुरू केले. त्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापकांकडून ऑनलाईन वर्ग घेतले जात आहे. मागील वर्षीच्या ११ वी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज व नोंदणी महाज्योतीच्या संकेतस्थळावर केली होती. त्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण मागील तीन महिन्यापासून सुरू आहे. महाज्योतीकडे नोंदणी झालेल्या तीन हजार विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप सुरू आहे. तसेच या टॅबसोबतच विद्यार्थ्यांना दररोज सहा जीबी इंटरनेट डेटा टॅबमधील सीमच्या माध्यमातून नीटची परीक्षा होईपर्यंत मोफत दिला जाणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तके मोफत घरपोच पाठविणार असल्याचे प्रा. गमे यांनी सांगितले.

एकाच शाळेतील ५१ विद्यार्थिनींचा सहभाग .

     या टॅब वाटप कार्यक्रमात अल्लीपूर येथील इंदिरा गांधी कन्या कनिष्ठ महावि द्यालयातील प्राचार्य अर्चना मुडे यांनी वर्धा जिल्ह्यात एकाच शाळेतील ५१ विद्यार्थिनींना या प्रशिक्षण योजनेत सहभागी करुन घेतले. तसेच त्या विद्यार्थिनींना मोफत टॅबचा लाभ मिळवून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विशाल हजारे, प्रभाकर धोटे, प्रथमेश हांडे, रोहित ताजने, श्याम जगताप, योगेश खोडे तसेच समाजकल्याण विभागाचे अधीक्षक अंकेश केदार, सचिन राऊत, किरण बोरकुटे, प्रेमलता बुरंगे व यशवंत महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

     जेईई नीट, सीईटी २०२३ साठी अशाच प्रकारची ऑनलाईन प्रशिक्षण व मोफत टॅबसाठीच्या योजनेची नोंदणी महाज्योतीच्या संकेतस्थळावर १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू आहे. तरी यावर्षी ११ वी सायन्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. -  प्रा. दिवाकर गमे, संचालक, महाज्योती.

 

Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209