सांगली : असंघटित ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संबोधन मेळाव्याचे आयोजन कराड येथे शुक्रवारी ( दि. १२ ) करण्यात आले आहे. या संबोधन मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीचे राज्याचे मुख्य समन्वयक सुशीला मोराळे, अरुण खरमाटे, आमदार राजेश राठोड, माजी आमदार रामराव वडकुते, नंदकुमार कुंभार, कल्याणदळे, डॉ. विवेक गुरव मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, चिपळूण, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कराड येथील वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज्याचे मुख्य समन्वयक अरुण खरमाटे व राज्य समन्वयक संजय विभुते यांनी सांगली येथील बैठकीत केले.
यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक जिल्ह्याचे मुख्य समन्वयक सुनील गुरव यांनी केले. सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी राज्य संघटक नंदकुमार नीळकंठ, नेते बाळासाहेब गुरव, जिल्हा समन्वयक शशिकांत गायकवाड, जिल्हा सहसमन्वयक बाळासाहेब कुंभार उपस्थित होते.
दिनकर पतंगे, चंद्रकांत मालवणकर, सतीश गुरव, प्रमिला म्हारनूर, शरद झेंडे, रंजना माळी, महेश सुतार, रवी सोलनकर, अर्जुन पाखले, धनपाल माळी, नीलेश संकपाळ उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan