दुसाने ( जि. धुळे ) येथे सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने बळिराजाची मिरवणूक काढण्यात आली होती. बळिराजाच्या जयघोषांनी दुसाने परिसर दुमदुमला होता. वीर एकलव्य यांच्या स्मारकाला कॉ. आर. टी. गावित यांनी पुष्पहार घालून मिरवणुकीस सुरुवात झाली. या वेळी सरपंच सुशीला ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य विवेक पिंपळे, मन्साराम पवार, कॉ. गोपीचंद महाले, ज्ञानेश्वर पदमोर, भटू पदमोर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रवींद्र बागूल यांनी केले, दिलीप ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. अश्पाक कुरेशी यांनी आभार मानले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan