नंदुरबार पोलीस स्टेशन आवारात शहीद किसान ना अभिवादन करण्यात आले आज दिनांक 9 /11/2021 रोजी नंदुरबार शहरात किसान अस्थिकलश अभिवादन यात्रा चे आगमन दुपारी 1.30 वाजता झाले पोलीस स्टेशनं च्या आवारात अभिवादन सभा घेण्यात आली यावेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे मा.. अध्यक्ष रामशिंग गावित यांच्या नेर्तृत्वा खाली लखीमपूर खिरी उत्तर प्रदेश मधे शांततने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनावर आंधधूत पने गाडी चडवत 4 शेतकरी व् पत्रकार ला मारणाऱ्या उत्तर प्रदेश चे राज्यगृह मंत्री च्या मुला ला अटक करून गुन्हा नोंद करा व शहीद किसान अमर रहे, मोदी शाह सरकार मुर्दाबाद च्या घोषणा देत अभिवादन सभेला सुरवात झाली यावेळी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष स्मिता ताई वळवी कॉम. किशोर ढमाले, कॉम. कॉम सुभाष दादा काकूंस्ते, कॉम. लिलाताई वळवी,कॉम.आर. टी गावित सह कार्यकर्त्यांनी अस्थीकलेश ला फुले वाहत श्रदाजली वाहली यावेळी कॉम. किशोर ढमाले, कॉम. सुभाष दादा काकूंस्ते कॉम आर टी गावित रणजित गावित, लिलाताई वळवी यांनी शेतकरी आंदोलनात शेतकरी विरोधी कायदे व्ह आजची हुकमशाही कडे जात असलेली सत्तेदारांची हुकमशाही बाबत मार्गदर्शन केले शेवटी मा. फुले रचित सत्याचा अखंड म्हणत कॉम रामसिंग गावित यांनी अभिवादन सभेचा समारोप केला सूत्रसंचालन दिलीप गावित यांनी केले