कवठे महांकाळ दि. १ - एस. बी. सी. संघर्ष समिती च्या वतीने आज एस.बी.सी. आरक्षण बचाव आंदोलनांतर्गत तहसीलदार यांना एस.बी.सी. आरक्षण ५० टक्क्याच्या आत बसविणे बाबतचे निवेदन तहसीलदार बी जे गोरे देण्यात आले. याप्रसंगी समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी, सुभाष कोष्टी, प्रा, विजय कोष्टी, भारत जमगे, रेवणसिद्ध म्हेत्रे यांनी एस.बी.सी. प्रवर्गाचे २ टक्के आरक्षण हे ५० टक्क्याच्या आत बसविणे बरोबरच एस.सी./एस.टी. ला असणाऱ्या सर्व सवलती जशाच्या तशा दिल्या जातील आणि एस.बी.सी. प्रवर्गास क्रिमी लेअर चे तत्व लागू राहणार नाही या निर्णयाची अंमलबजावणी करावी व आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे सांगितले. प्रदेशाध्यक्ष शशिकांत आमने यांच्या आवाहनानुसार दि. १ ते १० नोव्हेंबर अखेर विविध पद्धतीने आरक्षण बचाव आंदोलन उभारले जाणार असून यामध्ये तहसीलदार, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, मुख्यमंत्री आदींना निवेदने, एस.एम.एस. आणि ईमेल च्या माध्यमातून एस.बी.सी. संघर्ष समिती च्या मागण्या पोचविल्या जाणार आहेत. याप्रसंगी समितीचे कार्यकर्ते प्रा. विजय कोष्टी, संजय नागजे, रविंद्र जमगे, गौरीहर जमगे, प्रवीण जमगे, शुभम कोष्टी आदी उपस्थित होते.