ओबीसी समाज स्‍वतःचा राजकीय पर्याय निर्माण करणारच  - पडळकर

    पुणे - दरवर्षीप्रमाणे जेजुरीगड येथे ओबीसी दसरा मेळाव्याचे आयोजन जय मल्हार सांस्कृतिक सभाग्रह जेजुरी येथे करण्यात आले होते. सर्वच प्रस्थापित पक्षातील प्रस्थापित नेत्यांनी ओबीसीची केलेली कोंडी फोडायची असेल तर ओबीसी चा स्वतःचा हक्काचा पर्याय पर्याय निर्माण करण्याच्या भूमिकेवर विचार करण्याची वेळ आलेली आहे. ओबीसी, व्हीजेएनटीमध्ये ८५ हून अधिक संघटना कार्यरत आहेत. परंतु ओबीसी समूहाला प्राधान्य देऊन काम करणारा हक्काचा कोणताच पक्ष नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने एकत्र येऊन राजकीय पर्याय उभा करणार असल्याचे प्रतिपादन दसरा मेळावा संयोजन समितीचे आयोजक नवनाथ पडळकर यांनी केले.

     यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दादाभाऊ चितळकर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ विचारवंत व ओबीसी चळवळीचे प्रणेते श्रावण देवरे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या मध्ये सुधाकर राव आव्हाड, राजाराम पाटील, आप्पासाहेब आखाडे, अशोकराव कोळेकर, डॉक्टर विष्णुपंत गावडे आदी मान्यवर होते.

Jejuri gad OBC dasara melava    यावेळी बोलतांना दादा भाऊ चितळकर म्हणाले की, ओबीसींच्या जातनिहाय जनगणना, ओबीसींचे गेलेले राजकीय आरक्षण, प्रमोशन मधील आरक्षण प्रश्नामुळे अडचणीत आलेला भटक्याविमुक्तांचा कर्मचारीवर्ग आदी मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. धनगर आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न यावर देखील त्यांनी सर्व प्रस्थापित पक्ष्यांच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेवले. येत्या काळात महाराष्ट्र मध्ये ओबीसी भटका, विमुक्त, धनगर साळी माळी कोळी तेली रामोशी अशा अठरापगड जातींना एकत्र येऊन स्वतःच्या हक्काचा लढा स्वतः उभा करावा लागेल. यासाठी संघर्ष करण्याची तयारी आजच्या युवकांनी ठेवावी. प्रस्थापितांच्या वळचणीला न जाता आता ओबीसींनी स्वतःची राजकीय वाट तयार करावी. यासाठी राज्यभर फिरून जिल्हानिहाय बैठकांचे आयोजन करण्याची सूचना त्यांनी केली. तळागाळातल्या खेड्यापाड्यातल्या कार्यकर्त्याला या चळवळी बरोबर जोडल्या शिवाय ओबीसी चळवळ यशस्वी होणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली.

    यावेळी ओबीसी व्हिजे, एनटी, एसबीसी समाजाला एकत्र करून व मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजाला सोबत घेऊन राज्यात आता स्वतंत्र राजकीय शक्ती उभी करावी. त्याचे स्वरूप ठरविण्यासाठी राज्यातील जिल्हानिहाय बैठका घेऊन शेवटी मुंबईत निर्णयाची घोषणा करण्यात येईल. महाराष्ट्रात ओ बी सी भटके-विमुक्त एसबीसी जोडो अभियान राबविणार. त्यासाठी राज्यभर जनजागर रथयात्रा काढून राज्यातील विविध जाती जमातीच्या संघटनांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल. तसेच महाज्योतीचा निधी, मागसवर्गीय आयोगाचा निधी, धनगर समाजाच्या १३ विकास योजनांसाठी चा एक हजार कोटीचा निधी या बाबी मिळवण्यासाठी ओबीसी भटके-विमुक्त धनगर समाज आता एकत्रितपणे लढा लढणार असल्याचे ठराव यावेळी मंजूर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार आंधळे यांनी केले. तर आभार नवनाथ पडळकर यांनी मानले. यावेळी विजय बोडेकर भगवानराव जराड जगन्नाथ पैकेकरी धोंडीराम मलगुंडे, रामदास महानवर, राजु गोडे, दत्तात्रय गवते , अरविंद एलपले , सुनील गोटखिंडे, विक्रम माळवदकर, अनिकेत भालेराव, रवींद्र सोलंकर आदी मान्यवरांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे आयोजन दसरा मेळावा संयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी केले.

     सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष ओबीसी आरक्षण विरोधी : प्रा. श्रावण देवरे सर्वच ४ प्रस्थापित पक्ष ओबीसीच्या राजकीय आरक्षण विरोधी आहेत. हे या प्रस्थापित पक्षांच्या भूमिकेतून दिसत आहे म्हणून येत्या काळात ओबीसीला तामिळनाडूच्या धर्तीवर ओबीसी केंद्री पर्यायी व्यासपीठ उभे करण्याची गरज व्यक्त केली. सर्व प्रस्थापित पक्षांनी तसेच विस्थापित, वंचित पक्षांनी देखील ओ बी सी चा वापर करून ओबीसीला वाऱ्यावर सोडले. म्हणून आता ओबीसी केंद्री राजकारण उभे करावे लागेल अशी भूमिका यावेळी ओबीसी चळवळीचे नेते प्रा. श्रावण देवेरे यांनी मांडली.

 

Satyashodhak, obc, Mahatma phule
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209