झरीत ओबीसी जातनिहाय जनगणने साठी ओबीसींचे एकदिवशीय धरणे आंदोलन

     झरी जामणी तालुक्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्ही.जे., एन.टी, एस.बी.सी. जातनिहाय जनगणना कृती समितीच्या वतीने आज ३० आक्टोबर २०२१ ला झरी तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय आंदोलन करण्यात आले. ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यास स्पष्ट नकार देणाऱ्या मुजोर केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला. विधिमंडळाच्या मागासवर्गीय समितीने मागासवर्गीय मुलामुलींसाठी स्वतंत्र वस्तीग्रह निर्माण करून देखभाल करण्याच्या सूचना केल्या होत्या. युती सरकारच्या काळात ३० जानेवारी २०१९ प्रत्येक जिल्ह्यात एक यानुसार ३६ वसतिगृहे सुरु करण्याचा आदेश देण्यात आले. २२ आगस्ट १९ ला नागपूर अहमदनगर यवतमाळ ज्या ठिकाणी नवीन वसतिगृह बांधण्यात अनुमती देण्यात आली. 

OBC Andolan for OBC caste census in zari jamni taluka     महाविकास आघाडीच्या सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एका जिल्ह्यासाठी दोन या प्रमाणे ३६ जिल्हयात एकूण ७२ वसतिगृहे उभारण्याचे आश्वासन दिले पण एकही वस्तीगृह उभारलेले दिसत नाही. ओबीसी विद्यार्थ्यांच्या भावना चा विचार करून सहा विभागात वस्तीगृहबांधण्यात यावे .बांधकाम पूर्ण होईपर्यंत भाडे तत्त्वावर सुरू करण्यात यावे. या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरु करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी कृती समितीचे आशिष साबरे, प्रकाश बेरेवार, आजाद उदकवार, प्रफुल चुकलवार, साई बोंगिरवार, तुळशीदास आवारी, नेताजी पारखी, छबुताई आसुटकर, ममता पारखी, सविता व-हाटे ,संतोष गोहकार, गणेश बुट्टे, संजय चामाटे, सुनील शिरपूरे निलेश नीलमवार, प्रेम नडलवार यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Satyashodhak, obc, Mahatma phule
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209