सातारा : महाराष्ट्र अंधश्रध्दानिर्मूलनसमितीच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन मिड ब्रेन एक्टिवेशनचा भांडाफोड करण्यात आला.महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या अॅड. मुक्ता दाभोळकर यांनी सविस्तर भूमिका मांडली.
बीड ब्रेन अक्टिवेशनच्या मागे आर्थिक गणित, छद्म विज्ञान, पालकांची मानसिकता या माध्यमातून मुलांचे होणारं शोषण, ताण तणाव अशा सगळ्याच गोष्टी जोडलेल्या आहेत. ते अनेक उदाहरणांसह पत्रकारांसमोर सविस्तरपणे मांडल्या. बीड ब्रेन अॅक्टिवेशनच्या नावाखाली आर्थिक शोषण केले जाते हे छद्म विज्ञान आहे. केबीसी सारख्या शोमध्ये सुप्रसिध्द व्यक्ती जेंव्हा त्याचे कौतुक करते तेंव्हा त्याचा प्रचार आणि प्रसार प्रचंड वेगाने होतो. ही बाब अतिशय गंभीर आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या छद्म विज्ञानाच्या माध्यमातून होणाऱ्या शोषणाला तातडीने आळा बसावा. यावेळी राजू कोळी आणि स्वप्नील शिरसाट यांनी कुठलेही मिड ब्रेन अॅक्टिवेशनचे थोतांड न करताही या गोष्टी कशा सहज घडवल्या जातात? याचे प्रात्यक्षिक सर्व पत्रकारांसमोर करून दाखविले व मीड ब्रेन अॅक्टिवेशनच्या नावाखाली कसे फसविले जाते? हे सहप्रयोग समजावून सांगितले. त्याचबरोबर पत्रकारानी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमा संदर्भात केबीसीच्या संयोजकांशी संपर्क साधून निषेध नोंदवला जाईल. त्याचबरोबर अशा गोष्टी होणार नाहीत. याची काळजी घेण्यासाठी पत्रव्यवहार केले जातील, असेही समितीतर्फे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला अॅड. मुक्ता दाभोळकर यांच्यासोबत अंनिसचे राजीव देशपांडे, राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan