नाशिक : विद्रोही संमेलन है आमने सामने तसेच मराठी साहित्य संमेलनाच्या तारखांनाच घेण्याची परंपरा असल्याने यंदाचे संमेलनही ४ आणि डिसेंबरलाच घेण्याच्या दृष्टीने तयारीला लागण्याचा संकल्प संमेलनाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. मात्र, संमेलनाच्या अधिकृत तारखांची घोषणा येत्या आठवड्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विद्रोही साहित्य संमेलनाची बैठक त्र्यंबक नाका येथील हॉली क्रॉस चर्चच्या सभागृहात गुलाम शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी स्वागताध्यक्ष अध्यक्ष शशी उन्हवणे, गणेश उन्हवणे, राजू देसले, किशोर ढमाले, शिवदास म्हसदे, साराभाई वेळूजकर, डॉ. अनिल सोनवणे, डॉ. भारत कारिया, चंद्रकांत भालेराव, हरिभाऊ जाधव, राज निकाळे, यशवंत बागुल, नारायण पाटील, रविकांत शार्दुल, राजू निकम, पंढरी पगारे, प्रल्हाद मिस्त्री, जयवंत खडताळे, देवेंद्र चव्हाण नीलेश उन्हवणे, आदी उपस्थित होते. बैठकीत तयारी आढावा घेण्यात आला. विविध निर्माण केलेल्या समितीच्या प्रमुखांनी संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच निधी संकलन सुरुवात करण्याचाही निर्णय घेण्यात आला. संमेलनाच्या नावे बैंक खाते नाशिक मचंट बँकेत उघडण्यात आले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan