नागपूर - महाविकास आघाडी, बहुजन कल्याण विभागातर्फे राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह तयार करण्यात आले नाही. यामुळे स्टुडंट्स राईट असोसिएशन ऑफ इंडिया, संघर्ष वाहिनी नागपूर आणि इतर समविचारी संघटनांतर्फे राज्यात व नागपुरातील संविधान चौक येथे उद्या दि. ३० ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता थरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र विधान मंडळाच्या इतर मागासवर्ग कल्याण समितीच्या ५ ऑक्टोबर २००५ रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीत, जिल्हास्तरावर इमाव, विजाभज, विमान प्रवर्गातील मुला-मुलीसाठी नवीन शासकीय बसतिगृहे सुरू करण्याची व त्यांची देखभाल करण्याची सूचना राज्य शासनास करण्यात आली. तर २०१९ जानेवारीला ३६ ठिकाणी वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून ३६ वसतिगृहाऐवजी ७२ वसतिगृहे (प्रत्येक जिल्ह्यात दोन) बांथली जातील अशी घोषणा केली गेली. मात्र तेव्हापासून बसतिगृह २०२१ पर्यंत बांधलीच गेली नाही तसेच विद्यार्थ्यांना स्वाधारचा लाभही देण्यात आला नाही. एकप्रकारे ओबीसी, विजाभज, विमान वर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय केला गेला. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलां-मुलींसाठी प्रत्येकी १०० जागेचे स्वतंत्र वसतिगृह व सहाही विभागीय स्तरावर ५००-५०० जागेचे स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात यावेत, तोपर्यंत भाड्याच्या इमारतीत विद्यार्थ्याची सोय करावी व इतर विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule